महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.
![🧐](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tdd/1/16/1f9d0.png)
योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.
![👨💼](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t9a/1/16/1f468_200d_1f4bc.png)
पात्रता :
![🔖](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t32/1/16/1f516.png)
उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
![🔖](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t32/1/16/1f516.png)
उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
![📑](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t19/1/16/1f4d1.png)
असा करा अर्ज :
१) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
(
https://bit.ly/3rMnBoG या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )
२) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.
४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.
![🎯](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tb0/1/16/1f3af.png)
निवडप्रक्रिया : बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.