1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा.
2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या.
3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम सहपरिवार पाहावे.
4)आठवडयातुन एकदा घराजवळच्या बुद्ध विहारात सहपरिवार अवश्य जा.तसेच घरामध्ये ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे सामुहिक पद्धतीने वाचन करा.सोबतच बौद्ध संस्कार पूजा पाठ, मिलिंद प्रश्न,धम्मपद,बुद्ध आणि कार्ल मार्क्स,क्रांती प्रती क्रांती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र(लेखक-धनंजय कीर)रमाई कादंबरी (लेखक-यशवंत मनोहर),भारतीय संविधान इ.पुस्तके आवर्जून वाचा.
5)महिन्यातील प्रत्येक पोर्णिमेला सहपरिवाराने अष्टशील धारण करुन उपोसथ करा.
6)किमान वर्षातून एकदा तुमच्या घरी भिक्खू संघास निमंत्रित करुन त्यांना भोजन,चिवर,औषध,उपयोगी वस्तूचे दान करा.
7)वर्षातून एकदा विहारात किंवा घरी समाज बांधवाना बुद्धपुजेसाठी बोलावून खीर दान करा.
8)वर्षातून दहादिवस विपश्यना /श्रामणेर शिबिरात प्रत्यक्ष सहभागी व्हा.
9)वर्षातून किमान एका बौद्ध पर्यटन (स्तूप,चैत्य,लेणी)स्थळाना सहपरिवार भेट द्या.
10)वर्षातून किमान एकतरी बौद्ध संस्कृतिवर आधारलेल्या नाट्य,सिनेमा,प्रदर्शन अश्या कलाकृतिचा सहपरिवार आस्वाद घ्या.
टिप-बौद्ध असून आपण जर या गोष्टी गांभीर्याने केल्या नाही तर धम्म संस्कृती नव्या पीढित कशी रूजेल?म्हणून या वरील गोष्टी प्रत्येक बौद्ध बांधवाने (स्त्री व पुरुष)कर्तव्य म्हणून केल्याच पाहिजे.
-मिलिंदबनसोडे(बौद्धाचार्य),
नाशिक मो.9960320063