*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?*

*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्‍वास नव्हता*
*आम्हा मुलांना त्यांनी अत्यंत शिस्तीत वाढवले होते. आमच्या घरी येणार्‍या लोकांना महाभारत, रामायण यातील उतारे वाचून दाखवण्यास मला व माझ्या थोरल्या भावाला ते सांगत. हा प्रकार बरेच वर्ष चालला होता.*
*मी चौथीची परीक्षा पास झालो. माझ्या जातीतील मंडळींना या घटनेचे खूप कौतुक वाटले. त्यांनी वडिलांकडे येऊन माझा जाहीर सत्कार करण्याची परवानगी मागितली. परंतु त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. त्यांना सांगितले की याच्या लहानवयात असा सत्कार करून त्याच्या डोक्यात हवा भरेल. त्यांचा नकार ऐकल्यानंतर ही मंडळी दादा केळुसकरांकडे गेली. त्यांनी माझ्या वडिलांचे मन वळवले. मग ते या गोष्टीला राजी झाले*
*दादा केळुसकर स्वतः त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक मला भेट दिले. मी ते पुस्तक उत्कंठतेने वाचले. त्यातील काही प्रसंगांनी मी भारावून गेलो.*

*‘माझ्या वडिलांनी मला बौद्ध साहित्याचा परिचय कर, असे सांगितले नाही. म्हणून मी त्यांना सरळ विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे, शुद्र व दुर्लक्षितांची नालस्ती आहे, ते महाभारत व रामायण यांसारखे ग्रंथ मला का वाचायला देता? माझ्या वडिलांना तो प्रश्‍न रुचला नाही. मला असे प्रश्‍न विचारू नकोस, असे म्हणून त्यांनी मला गप्प केले.*

*‘माझे वडील स्वतःची हुकमत गाजवण्याच्या वृत्तीचे होते. तरीही धैर्य करून मी त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी पुन्हा त्यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की आपण अस्पृश्य आहोत आणि यापुढे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. रामायण आणि महाभारत वाचनाने तुझ्यातील न्यूनगंड दूर होईल. द्रोण आणि कर्ण ही अत्यंत लहान माणसे किती उंचीपर्यंत पोहचली ते पाहण्यासारखे आहे.* 
*वाल्मिकी हा कोळी असून तो रामायणाचा कर्ता झाला. त्याने रामायण लिहिले. अशा कारणांमुळेच मी तुला हे ग्रंथ वाचायला सांगतो. माझ्या वडिलांच्या त्या युक्तीवादाचा माझ्यावर परिणाम झाला नाही, माझे समाधान झाले नाही.*

*‘महाभारतातील किंवा रामायणातील एकही व्यक्ती माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही.*
*भीष्म आणि द्रोणाचार्य मला ढोंगी वाटतात. तर कृष्णाला लांडीलबाडी करणार्‍यांचा संकोच वाटला नाही आणि रामही मला आवडला नाही. त्याची शूर्पणखेशी वागणूक, सुग्रीवाशी वागणूक, सैन्याला दिलेली वूर वागणूक मला पटली नाही.*
*वडील माझ्या वागण्यावर काही बोलले नाहीत. पण माझ्या मनात बंड उठले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. मी त्यामुळेच बुद्धाकडे वळलो. बुद्ध मला आवडतो*

*आपला जन्म कोठे व्हावा हे कोणाच्या हाती नसते. आपल्या जीवनाचा जन्म, पूर्व आलेख नियती ठरवित असते. जन्माबरोबर येणार्‍या घटना स्वीकारल्या की जीवन यात्रा प्रारंभ करावी लागते. काही व्यक्ती जीवनाच्या वाटेवरून निमूटपणे चालतात. काही चालता चालता मागे पुढे पाहतात. ही वाट कुठून आली, जाणार आहे कुठे, या जगात एकच वाट आहे का? असे प्रश् न स्वतःलाच विचारणार्‍या व त्यावर मार्ग काढणार्‍या विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होतो.*

*डॉ. आंबेडकरांचे जीवन ही एक शोधयात्रा होती. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला तर महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्यांच्या घराण्याला शौर्याची परंपरा लाभली होती. वडील सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते. निवृत्तीनंतर आपल्या मुलांना शिक्षण कसे देता येईल या विवंचनेत ते असत. बाबासाहेबांना आपल्या आईवडिलांचा अभिमान होता. जेव्हा जीवनात नैराश्याचे क्षण येत तेव्हा बाबासाहेब आपली पत्नी रमाबाई यांना घेऊन एका विशिष्ट ठिकाणी जात. डोळे मिटून गंभीरपणे चिंतन करीत आणि नवचैतन्य घेऊन परत येत. हे तीर्थस्थान होते त्यांच्या वडिलांचे दहन केले होते ती जागा. ते स्थान म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात ते स्मृतीस्थळ होय.*

*खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे हितचिंतक नवल भंत्ते आणि राजर्षी शाहु छत्रपती या उभयतांचे साहाय्य घेऊन त्यांनी पुढील शिक्षणासाठी लंडनला प्रयाण केले. 1923 साली ते लंडन विद्यापीठाचे डी.एस.सी. झाले. बॅरिस्टर ही उपाधी त्यांना त्या काळात मिळाली. त्यांनी भारतात येऊन मुंबईच्या विधी महाविद्यालयात काही काळ प्राध्यापकी केली.*

*19 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. 1948 मध्ये त्यांनी भारतीय घटनेचा मसुदा लोकसभेपुढे सादर केला, त्या घटना समितीचे बाबासाहेब प्रमुख होते. डॉ. आंबेडकर कलात्मक जीवन जगणारे रसिक होते. तसेच भावसंपन्न जीवन जगणारे प्रापंचिक सुद्धा होते. दिल्लीतील आपल्या घराला एका बाजूने राजवाड्यासारखे तर दुसर्‍या बाजूला मठीचे झोपडीवजा रूप त्यांनी दिले होते. त्यांची अभ्यासिका, स्वयंपाकघर आणि विश्रांतीची खोली अतिशय साधी होती. परंतु उरलेले घर सजविलेले होते. त्यात सोफासेट, रंगीबेरंगी फुले, सुवासिक अत्तराचे फवारे, अंगणात कारंजे असा डामडौल होता.*

*कोणीतरी कुतूहलापोटी बाबासाहेबांना विचारले की एकाच वेळी ही साधी आणि उच्च अशी दुहेेरी राहणी कशाकरिता? त्यावर ते म्हणाले, ‘साधेपण माझ्यासाठी आहे. दिमाख आहे तो माझ्या दलित-गरीब बांधवांना आत्म प्रत्ययाचा प्रत्यय देण्यासाठी! आपल्यापैकी एकजण शिक्षणाच्या बळावर इतक्या मोठ्या पदाचा, संपत्तीचा धनी होतो हे त्यांच्या ध्यानी यावे आणि त्यापासून त्यांनी काही शिकावे. त्यांना स्वतः आणि येणार्‍या पिढीला शिक्षणाने काय काय साध्य करता येते हा संदेश मिळावा, यासाठी ही रचना आहे.’*

*डॉ. आंबेडकर आपल्या शिक्षणाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी कन्फ्युशियस या तत्त्वज्ञानीचे एक वचन नेहमी अनुयायांना ऐकवत. ‘तुमच्या जवळ दोन आणे असतील तर एक आण्याचे अन्न खरेदी करा आणि दुसर्‍या आण्याची पुस्तक घ्या. अन्न तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवील.’*

*असे महान जीवन जगणारा हा महामानव होता. भगवान बुद्धाने सांगितलेला दुःख निर्वाणाचा जो धम्म मार्ग आहे त्याचे डॉ. आंबेडकर हे प्रवक्ता झाले. देशातील कोट्यवधी गरीब लोकांचा ते उद्धारकर्ते झाले आणि त्यांनी नव्या भारताचे इतिहासकार म्हणून ख्याती मिळवली. ते घटनेचे शिल्पकार होतेच, समतेचेही ज्ञान त्यांनी समाजाला दिले. भवतु सब्ब मंगलम् म्हणजे तुम्हा सर्वांचे कल्याण होवो, या बुद्ध वचनाप्रमाणे ते जगले व वागले.
——————————————————-
🙏🌹जय✺भिम….नमो✺बुद्धाय🌹🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?