विलास वाघ सर यांचं निधन!

विलास वाघ सर म्हणजे गपचूप, कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व ! प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहात, साधी राहणी आणि सामाजिक प्रश्नची कळकळ, ही वाघ सरांची वैशिष्ट्ये !!

● 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे

●पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे
●पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय
● जून 1958 एसएससी परीक्षा पास
● 1958 ते 1962 पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण
● जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी
● 1964 ते 1980 पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी
● 1972 : सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू
● 1981 बीएड उत्तीर्ण
● 1983 : उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार
● 1981 ते 86 पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले
● 1986 पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा
● 1964 1980 या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली * सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले * राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष
● 1972 समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले * कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले * समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले * 1978 भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली * 1989 मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली
● 1994 मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले
● 1996 सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन
● 1974 पासून सुगावा मासिक सुरू केले
● समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी
● पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त
● परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना
● हुजूरपागा शिक्षण संस्थेत उषा ताई वाघ पदाधिकारी
————-
पुरस्कार
● 69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार
● दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप
● दलित मुक्तविद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेशचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप
● महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार
● औरंगाबाद येथील संस्थेचा लोक कैवारी पुरस्कार
● आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार
● प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार
● चार्वाक नागरी पतसंस्था नाशिक यांचा शांताबाई दाणी पुरस्कार
● समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार
● दादासाहेब रुपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार
● पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालक पदी नेमणूक
● दया पवार स्मृती पुरस्कार
● पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार
● आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार
Source of Information : Facebook wall of Dr. Sangram G Patil

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?