गाजे जगभर चवदार तळं माझ्या भीमाच्या मुळं

Dr. Sangram Patil’s facebook wall
20 मार्च 1927 ब्राह्मणवादाच्या जखडातून पाणी मोकळं झालं. त्यानंतर मनुस्मृती जाहीर दहन केली (25/12/1927), ब्राह्मण धर्मातून शूद्र आणि स्त्री च्या मुक्तीची सुरुवात झाली…
Bhante Karunand’s facebook wall
तहानलेल्या पाखरांवर तु कसे उपकार केलेस,
एकच ओंजळ पाणी प्यायलास पण सारे तळे चवदार केलेस.🙏
२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त क्रांतीसुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन.
Bhikku DhammaBodhi Thero’s facebook Wall
चवदार तळ्याचे पाणी…..
==============
चवदार तळ्याचे पाणी
भीमा तू चवदार केले,
तुझ्या पुण्य स्पर्शाने
पाणीही मुक्त झाले !!
पाण्याविना कित्येक पिढ्या
येथे मृत्युला प्राप्त झाल्या,
अज्ञानी गुलामांच्या मनात तू क्रांती ज्वाला निर्माण केल्या !!
जनावरांचा मुक्त संचार
ज्या पाण्यामध्ये होतो,
पण मानव असूनी आम्ही
रोज पाण्यासाठी तडफडतो !!
महाडच्या या पावन भूमीत
तू कांतीची मशाल पेटविली,
मनुवाद्याची सडकी निती
एका झटक्यात संपविली !!!
बुद्ध,फुलेंचा वारसा
भीमा तू जोपासला,
चवदार तळ्याचा सत्याग्रह
यशस्वी करून दाखविला !!!
✍️भिक्खू धम्मबोधी थेरो
*महाड चवदार तले सत्याग्रह*
*क्रांतीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
Vivek Kamble’s facebook Wall 
“चवदार तळ्याचे पाणी प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिध्द करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे.”
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रह :- १९, २० मार्च १९२७ (मुक्तीदाता विशेषांक)
२० मार्च १९२७
महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐
तहानलेल्या पाखरांवर तु कसे उपकार केलेस
एकच ओंजळ प्यालास
पण सारे तळे चवदार केलेस.👑👑👑👑👑

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?