तुम्हाला माहिती आहे का भा.द.वि. कलम ३७५ म्हणजेच बी.एन.एस कलम ६३ म्हणजे काय..?? कधी लागु होतो..??
तर मी सांगते,
भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७५ म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६३ मध्ये बलात्कार हा केव्हा ठरतो हे सांगितले आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या स्त्रीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्यास, किंवा तिच्यावर जबरदस्ती केल्यास, किंवा तिच्या नकळत किंवा फसवणूक करून किंवा ती बेशुद्ध असताना किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असताना तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्यास, ते बलात्कार मानले जातात,
जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले,
जर एखाद्या पुरुषाने स्त्रीवर जबरदस्ती केली किंवा तिच्यावर दबाव आणून शारीरिक संबंध ठेवले,
जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला फसवून किंवा तिची फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले,
जर एखादी स्त्री बेशुद्ध किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले,
जर स्त्रीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले,
तर बलात्कार ठरला जातो..
आणि या कलमाचा आजकाल दुरुपयोग जास्त होताना आढळत आहे..
मुलगा आणि मुलगी दोघेही relationship मध्ये असताना ते physical होतात मग त्यांच्यात खटके उडतात आणि breakup होतं..
आधी काय व्हायचं की मुलगा किंवा मुलगी एकमेकांसाठी रडायचे हात कापायचे, कर्कटक ने हातावर नाव लिहायचे एकमेकांच्या मित्रांनद्वारे मी किती तिरस्कार करते किंवा करतो हे सांगायचे जर कधी समोर आलेच तर एकमेकांना बघून रागाने डोळे मोठे करायचे नाही तर शिव्या द्यायच्या मन शांत होत नाही तो पर्यंत.. मग एकमेकांना jealous फील करवण्यासाठी नवीन मित्र मैत्रीण करायचा मग त्याच्या सोबत ex च्या समोर 10 वेळा जायचं म्हणजे त्याला फील होईल..
पण आता breakup झाल की एकतर गर्लफ्रेंडचा खून नाही तर बॉयफ्रेंड ला बलात्काराच्या केस मध्ये अडकवून टाकायचे म्हणजे कस माझा नाही तर कोणाचा नाही किंवा माझ्यासोबत वाईट केलं आता तुला जन्माची अद्दल घडवते/घडवतो.
कोणी एकतर्फी प्रेमात असेल तर समोरची व्यक्ति प्रेम नाकारत असेल किंवा मान्य करत नसेल तर खोटी स्टोरी बनवून पोलिसांना सांगायची आणि मग काय पोलीस मुलगी पीडित असल्यामुळे केस घेतात..
त्यात जर ऑफिस मध्ये एखाद्याचा कामाबद्दल वचपा काढायचा असेल तर काही मुली सर्रास खोटी केस करतात..
लग्न झालेल्या पुरुषा सोबत स्व इच्छेने relationship मध्ये राहतात पण तो बायकोला जास्त प्राधान्य देतो मला नाही मग करा केस माझा पण नाही तिचा पण नाही..
माझ्या नवर्यासोबत कामा मध्ये भांडण केलस तुला आता बरोबर कोर्टात खेचते.. आणि करा खोटी केस..
यामुळे काय होतय माहितीये का.. लोक प्रेम करायला मैत्री करायला कामावर ओळखी करायला घाबरू लागली आहेत.. नात्यांवर असलेला विश्वास उडू लागला आहे..
तुम्ही स्व खुशीने physical होता आणि बलात्काराची केस करून एखाद्याच आयुष्य खराब करता..
Physical होण्या आधी हजार वेळा विचार करत जा की उद्या जर तुमच्यात कुठल्या कारणावरून खटके उडाले तर breakup होईल.. मग त्या नंतर पुढे काय..??
माझ्याकडे असलेल्या दोन केसेस सांगते एकामध्ये लग्न झालेल्या मुलासोबत स्वताच्या मर्जीने मुलगी leave in relationship मध्ये 2 वर्षापासुन होती तिला सगळ्या गोष्टी मान्य होत्या त्याच लग्न त्याची मुल.. तिला काहीही हरकत नव्हती एकदिवस दोघांमध्ये बायकोला नवीन साडीच का घेऊन दिली यावरून जोरात भांडण झालं आणि ती पोहोचली त्याच्या घरी घरच्यांना त्या दोघांच्या प्रेम प्रकरणा बद्दल सांगून बायकोला घराबाहेर निघायला सांगत होती बायकोने तिच्याच कानाखाली लावून दिली तिने सुडाच्या उद्देशाने त्या मुलावर तिने बलात्काराचा गुन्हा नोंदवला..
दुसरी केस एकतर्फी प्रेमाची होती त्यामध्ये मुलीला त्याने नकार दिला म्हणून तिने त्याच्यावर खोटी केस केली आता
महत्वाच बलात्काराच्या केस मध्ये आपल्या योनी मध्ये आपल्या गुद्वारा मध्ये आणि आपल्या तोंडात जबर दुखापत झालेली मेडिकल मध्ये आढळून आले पाहिजे हे त्या मुलीच्या डोक्यात होते मग त्या मुलीने स्वताची virginity स्वतः दुखापत करून घालवली.. क्रॉस examination मध्ये तिने ते कबूल केले म्हणून तो मुलगा सुटला नाही तर मुलाला खोट्या केस ची मोठी किम्मत मोजावी लागणार होती.. तिला खोटी केस केली म्हणून शिक्षा झाली आणि दंड ही आकारण्यात आला..
सांगायचा मुद्दा हा आहे की काही मुली आजकाल विकृत होत चालल्या आहेत यामध्ये त्यांच्या पालकांचा सुद्धा समावेश आढळून येत आहे..
वयाच्या 18 वर्षी मुलाच्या प्रेमात पडली दोघे physical झाले तिच्या घरचे लग्नाला तयार नाहीत म्हणून तिने breakup केले त्याचे दुसरीकडे लग्न ठरले हे तिला बघवले नाही म्हणून तिने त्याच्यावर बलात्काराची केस केली.. कोणाला काहीच माहित नाही कारण victim च नाव disclose करायच नसत मग तीच लग्न झाल तिला मूल झाल तो बिचारा त्याच लग्न मोडलं आणि कोर्टाच्या फेर्या चालू झाल्या एकदिवस आला क्रॉस examination साठी तिच्या घरी कोर्टातून समन्स गेले तिने नवर्याला काहीही सांगितले नाही तिने नवर्याला आणि बाळाला घेऊन कोर्टात काम असल्याचे सांगून कोर्ट गाठले.. क्रॉस examination झाली नवर्याला समजले.. नवरा आपल्या बाळाला घेऊन तिला तिथे एकटीला सोडून निघून गेला कारण त्याला त्या क्षणाला तिने काय उपद्व्याप करून ठेवलाय ते समजले होते त्याला नको होती ती..
सांगायचे तात्पर्य की मुली रागाच्या भरात केस करून मोकळ्या होतात पण याचा दुष्परिणाम मुलींना सुद्धा भोगावा लागतो..
बर्याच अशा खोट्या केसेस हाताळल्या आहेत त्यामुळे सांगायचे येवढेच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या नात्यात येत असाल तर विचार करून नात्यात या.. आपल्याकडून कोणाची फसवणूक होऊ देऊ नका आणि कोणाकडून फसले जाऊ नका..
खोट्या केसेस मुळे आत्महत्या करणारी मुलं पाहिली आहेत त्यामुळे तुम्हाला अलर्ट करणे ही मी माझी जबाबदारी समजते..
आयुष्य खूप सुंदर आहे मनभरून जगा आणि जगू द्या..
✒️
👩🏻⚖️ ॲड.स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.
८८२८६७७१०२