
आज POCSO केसेस वर बोलुयात..
POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा कधी ठरतो..? जेव्हा मुलगी १८ वर्षा खाली असते आणि त्या मुलीवर कोणी जबरदस्ती केली, बलात्कार केला, छेडछाड केली, किस केल तिच्या शरीराला मुद्दाम हात लावला हात फिरवला मग ते कुठेही असो तेव्हा मुलावर केस फाईल होऊ शकते..
आता मुद्द्याला हात घालते कित्येक केसेस अशा आहेत ज्या मध्ये १८ वर्षा खालील मुली प्रेमप्रकरण करतात.. मुलासोबत intimate होतात आणि मग काही त्यातल्या प्रेग्नंट होतात.. जबरदस्ती झालेली नसते पण १८ वर्षा खालील असतात म्हणून ही केसेस होतात..
पण या गोष्टीचा काही मुलींच्या घरचे फायदा घेतात प्रेमप्रकरण असल्याचे माहीत झाल्यानंतर पोलिसात खोटी तक्रार करतात मग मुलीला दमदाटी करून खोटा जबाब द्यायलाही सांगतात..
पोलीस ती लहान असल्यामुळे तिची जास्त चौकशी करू शकत नाहीत पण मेडिकल केली जाते आणि त्या नंतर पुढे प्रोसेस सुरू होते.. यात settlement सुद्धा होते.. पण मग केस करण्याआधी विचार का नाही येत डोक्यात..
यात काय होतं त्या मुलांच्या आयुष्याची माती होते मुलीचे नाव समोर येत नाही पण मुलाचे भवितव्य खराब होते..
कॉलेज आता लांब राहीलं शाळेतली प्रेम प्रकरणं जास्त आहेत..
मी मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आई- वडीलांना सांगू इच्छिते की आपली मुलं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्यांना एक मित्र मैत्रीण म्हणून समजून घेणं समजवून सांगणं महत्वाच आहे कारण चांगल वाईट घरापासून सुरुवात होते मग दाराबाहेर मित्र मैत्रिणी, सोशल मीडिया..
तुम्ही मुलांच एकमेकांविषयी होणार Attraction थांबवू नाही शकत.. Attraction वाढत चाललं आहे हार्मोनल चेंजेस होत आहेत हे तुम्ही थांबवू नाही शकत पण त्यांना चुकीच पाउल न उचलण्याच शहाणपण देऊ शकता..
वय सरून जात लग्न होतात पण गुन्हेगाराचा ठपका मुलाच्या माथी विनाकारण लागला जातो..
माझ्याकडे अशा बर्याच POCSO च्या खोट्या केसेस आहेत ज्या मध्ये दोघांचे प्रेमप्रकरण आहे पण आईवडिलांनी मुलाच्या आयुष्याची गुन्हेगार बनवुन वाट लावली आहे.. माझ्या एका केस मध्ये तर आईने खोटी केस केली मुलगा जेल मध्ये गेला जसा सुटून बाहेर आला आणि victim १८ वर्ष पूर्ण झाली तिने त्याला contact करून बांद्र्याला बोलवून लग्न करून घेतले आईवडिलांच्या नाकावर टिच्चून दोघांचा सुखी संसार चालू आले..
काय निष्पन्न झालं यातून.. ज्या मुलाच्या नावाने केस केली त्याला आता जावई म्हणवून मिरवतात..
म्हणून लगेच केस करायला धाव घ्यायच्या आधी दोघां बद्दल नीट जाणून घ्या.. काय माहीत आज खोटी केस केली म्हणून उद्या तुमच्या मुलीला समाजात वाईट नजरेने बघितले जाईल..
तुमच्या खोट्या केसेस मुळे खर्या केसेसना बळ मिळत नाही कोर्ट मध्ये रोज या केसेस ऐकायला मिळतात.. त्यामध्ये या प्रेमप्रकरणाच्या केसेस आम्ही बघतो..
आई वडील मी फक्त माझ्या बाळासाठी अस मानून चालू नका..
गांभीर्य समजून घ्या आणि तसेच पाउल उचला..
काही सल्ला हवा असल्यास किंवा तुमच्या मुलांची counseling करायची असल्यास मला संपर्क करु शकता..
✒️
👩🏻⚖️ॲड. स्नेहल निकाळे-जाधव
मो. +91 88286 77102
वकील उच्च न्यायालय मुंबई.