भय आणि द्वेष…. हीच फॅसिस्टांची मुख्य शस्त्र !

समाजाच्या प्रत्येक घटकात सत्तेप्रती भय निर्माण करण्याचा फॅसिस्टांचा सतत प्रयत्न असतो ! जेणेकरून सत्ताधीशांविरुद्ध कुणीही आवाज बुलंद करू नये !
चित्रात लॉकअप असलेले तरुण मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या वर्तनाबद्दल वृत्तांकन केलं. आमदार चिडले. पोलिसांच्या सहकार्यांनं आमदार महोदयांनी सगळ्यांना थेट लॉकअपमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.
पोलिसांनी सगळ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावरच चार्जेस लावले. आणी अखेर, सगळ्यांची नग्न अवस्थेत शहरातून धिंड काढण्याची धमकी दिली.
लोकशाहीचा चौथा खांब म्हणतात वृत्तपत्रांना…!
तंगडी वर करून कुत्र्यांनी जवळ जावं अशी या खांबाची अवस्था केलीय फॅसिस्टांनी आज देशात !
Image source: The FreePress Journal

Post from facebook wall of

Dr Sangram Patil

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?