डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

THOUGHTS • EQUALITY • EDUCATION

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

ज्ञानाचा प्रकाश, समतेची वाट आणि स्वाभिमानाचा संघर्ष — महामानवांच्या विचारांतून नव्या भारताची प्रेरणा.

शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!

📚 शिक्षण आणि ज्ञान

“

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

“

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

“

स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

“

पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

“

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

“

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.

⚖️ समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय

“

जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

“

मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

“

माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म हा माणसाकरिता आहे.

“

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे.

“

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीय ही भूमिका घ्यावी.

“

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती.

👩‍🎓 महिला सक्षमीकरण आणि स्वाभिमान

“

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

“

स्त्री-पुरुष समानता आणि महिलांचा सन्मान हा प्रगत समाजाचा पाया आहे.

“

अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे.

🔥 संघर्ष, धैर्य आणि आत्मविश्वास

“

नशिबावर नाही, तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

“

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

“

ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.

“

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील.

“

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.

“

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा!

🕊️ बुद्ध, धम्म आणि करुणा

“

करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

“

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

“

सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

“

धर्म हा जर कार्यान्वित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे.

🇮🇳 राष्ट्र, संविधान आणि लोकशाही

“

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

“

भारतातील जाती सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

“

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय शक्ती होय.

💙 विचार जपा • ज्ञान वाढवा • समाज घडवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचा, समजून घ्या आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवा.

जय भीम! नमो बुद्धाय!

समता • स्वातंत्र्य • बंधुता • न्याय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *