बलात्कार एक विकृत मानसिकता – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव

भारतातील खेदजनक परिस्थिती..
कधी कधी वाटते की या अशा बलात्कारी देशात माझ्या पोटी मुलगी जन्माला नाही आली कारण आता मुली घरात, दारात, शाळेत, मार्केट, गार्डन अशा बर्‍याच ठिकाणी जिथे पब्लिक असते तिथेही सुरक्षित नाहीत.. कदाचित निसर्गाची किमया मुलगी हवी असताना मुलगा झाला..
कानपूर मध्येही एक मुलगी तिच्या घराबाहेर एकटी खेळत असताना तिथल्याच स्थानिक तरुणाने तिला एका मंदिरामागील निर्जन भागात नेले आणि तिच्या तोंडात पाने भरून तिच ओरडण बंद करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा हे निष्फळ ठरले तेव्हा त्याने तिच्यावर विटेने वार केले ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. आवाज आणि गोंधळामुळे शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हेगार तिथून पळून गेला.
या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, मुलीच्या डोक्याचे चार भाग झाले आणि तिची कवटी उघडी पडली. तिच्या भुवयाच्या वरती खोल जखमाही झाल्या आहेत गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय कला यांनी स्वतः तिच्या जखमांवर उपचार केले आहेत.
रोज मुलींवर बलात्कार होतात रोज मुली मारल्या जातात..
आधी घरातील जेष्ठ मंडळी घराला वारस म्हणून मुलाची अपेक्षा करायचे पण आता आईवडील आपली मुलगी येणार्‍या काळात सुरक्षित नसेल तर म्हणुन मुलाची अपेक्षा ठेऊन आहेत..
भारतातले वातावरण गढूळ झाले आहे जिथे मुलेमुली पुरुष स्त्री कोणीही सुरक्षित नाहीत..
महिला तक्रार निवारण केंद्र म्हणत की आधी नवरा सासरचा मार खाऊन तू आत्महत्येला प्रवृत्त तर हो मग येतो आम्ही..
सुरक्षारक्षक म्हणतात की आधी कोणी मरु दे कोणाचा बलात्कार होऊ दे कोणी किडनॅप होऊ दे, कोणी विकले जाऊदे, ॲसिड हल्ला होऊ दे कुठे जातीवरून कोणाची हत्या होऊ दे मग आम्ही येतो मदतीला धावत पळत..
आणि सरकार झोपलय मग ते केंद्र असो नाही तर राज्य.. झोपलयं सरकार.. आराम करतय त्यांना जाग निवडणूक लढवायच्या वेळेस येते..
इतके राजकीय पक्ष आहेत पण समाजातील घडामोडींशी कोणालाही घेणेदेणे नाही.. प्रत्येकाला माझी खुर्ची माझा माज माझे बिनडोक कार्यकर्ते मी बोलेल उठ तर उठतील बस तर बसतील
नेत्यासाठी जीव पण देतील पण समाजहितासाठी घंटा काही करणार नाहीत.. आवाज पण तेव्हाच निघेल जेव्हा कुठला स्टंट करायचा असेल ज्यामुळे पक्षाच आणि त्या दोन कौडीच्या कार्यकर्ताच नाव होईल..
सुरक्षे साठी सामन्य माणूस धडपडतो पण हाती त्याच्या काहीच लागत नाही..
भारतातील परिस्थिती वर खेद व्यक्त करायचा की अशा भारतात आपण राहतो याची लाज वाटून घ्यायची काहीच कळत नाहीये..
✒️
👩🏻‍⚖️ ॲड. स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?