न्यायदेवतेच्या डोळ्यावरील जी पट्टी होती आणि आता ती नाही असं काहीतरी वेगळं करणे खरंच योग्य आहे की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे.
अस मानल जात होतं की जे डोळ्यावरील पट्टी आहे ती न्यायदेवता न्याय करत असताना पुढे कोण आहे? गरीब व्यक्ती आहे की श्रीमंत आहे महिला आहे की पुरुष आहे हे न्यायदेवताला कळत नव्हतं, कळू नये म्हणून हे प्रतीक आतापर्यंत ह्या न्यायदेवतेच्या मूर्तीच्या माध्यमातून जागोजागी आपणास पाहायला मिळत होते, पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय धनंजय चंद्रचूड यांनी काही या न्याय जातीच्या मूर्तीमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती लावण्यात आली आहे.
आधीच्या मूर्तीवर डोळ्यांवर पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची.आता नव्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली गेली आहे. तसेच हातात तलवारच्या ऐवजी संविधानाची प्रत दिसते.