भीम जयंती दिनी ‘संविधान’ वाचविण्याचा संकल्प करूया!

Table of Contents

प्रस्तावना

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष उलटली, १९५० रोजी ह्या देशाला संविधान बहाल करण्यात आले. व खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही नांदू लागली. १९५० अगोदर जे जुलमी कायदे, रूढी परंपरा होत्या त्या सर्व एका फटक्यात बाबासाहेबानी संविधानाच्या रूपाने त्यास दूर केले. देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या त्रिसूत्रीत बांधले व खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य उदयास आले. भारत देशामध्ये १८ पगड जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असलेले तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत.

पण अलीकडच्या काळात काही धर्मांध शक्तीने संविधानातील एक एक मूल्य छाटून टाकण्यास सुरुवात केलेली आहे. संविधान कमकुवत बनविण्याचे काम मनुवादी पिलावळ करत असलेले आपण पाहत आहे.

डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, “जोपर्यंत संविधान जिवंत आहे मी जिवंत आहे, त्याला मरू देऊ नका.” तर आता वेळ आली आहे बाबासाहेबांच्या ह्या वचनाला जागण्याची!

images (1) (5)

खरंच संविधान धोक्यात आहे का?

गेल्या काही दशकामध्ये ज्या पद्धतीने देशाची वाटचाल चालू आहे ते जर का पाहिले तर आपण असं म्हणू शकतो की आपल्या भारतचे संविधान १००% धोक्यात आलेले आहे. संविधानाने ह्या देशातील समस्त नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले आहेत, बोलण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, धर्म निवड आणि पालन करण्याचा अधिकार पण सध्याच्या काळात ह्यावर घाला घालण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. कुणी सामान्य नागरिक विरोधी पक्षातील नेते सरकार विरोधात आवाज उठविला तर त्यास सरळ तुरुंगात डांबण्यात येत आहे.

ज्या स्वायत्त संस्था आहे ईडी, सीबीआय त्याचा गलत आणि सूडबुद्धीने वापर होत आहे. शासकीय यंत्रणेला धाब्यावर बसवून हुकूमशाहीची राज्य आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, कुस्ती पट्टूचे आंदोलन, विद्यार्थ्यांचे आंदोलन असंवैधानिक मार्गाने दाबण्यात आलेले आपण पाहत आहेत. लोकशाही मध्ये नागरिकांना आपल्या सद् सद् विवेक बुद्धीने मतदान करून जुलमी शाशन उलथवून लावण्याचा अधिकार समस्त नाकारिकाना घटनेने बहाल केलेला आहे, पण ई व्ही एम रुपी यंत्राने तो अधिकार छिनून घेतला आहे.

तर अशा अनेक बाबीवरून आपल्या लक्षात आले असेल की संविधानाची उघड उघड पायमल्ली होत आहे. त्यामुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झालेला आहे.

माझ्या एकट्याने संविधान वाचविणे शक्य आहे का ?

होय हे शक्य आहे, भारताच्या राज्य घटनेच्या प्रास्ताविके मध्ये म्हटल्या प्रमाणे ‘आम्ही भारताचे लोक’ ह्या पासून संविधानाची सुरुवात झालेली आहे, तर आपण सर्वजण देश वाचवण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी आणि धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी संकल्प करून योग्य ते कार्य सिद्धीस नेऊ शकतो. एवढी मोठी ताकत संविधानाने आपणा सर्वाना बहाल केली आहे.

आपण सर्वजण आपापल्या परीने जर का डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्य जयंती दिनी संकल्प केला तर देशाच्या दुश्मनांना पळता भुई थोडी होईल, एवढे मोठे सामर्थ्य आपणा मध्ये आहे हे तुम्हाला भीमा कोरेगांव च्या इतिहासावरून लक्षात येईल.

जय भीम, जय शिवराय जय भारत.
ऍड. प्रेमसागर गवळी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

संविधान वाचविण्याचा संकल्प करून १३३वी भीम जयंती साजरी करा!

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?