“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू

देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायमराहील. मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही जी सामाजिक कीड आहे ना, ती खरे तर देव या काल्पनिक पात्राने निर्माण केली आहे. जगात देव अस्तित्वात नाही, परंतु समाजातील काही आळशी आणि कर्तृत्वशून्य माणसांनीच त्याचा बागुलबुवा उभा केला.

पुरोगामी चळवळीतील उर्ध्वयू आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीरामलागू म्हणतात त्याप्रमाणे, आता देवाला रिटायर केले पाहिजेत. त्यांच्या याच विचारांचा शुक्रवारी त्यांनी पुन्हा पुण्यात पुनरूच्चार केला. आता डॉक्टरांनी सांगितले आहे, की परमेश्‍वराचे अस्तित्व हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. त्यांचे हे म्हणणे पटत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत कामकरणार्‍या माझ्या मित्रांनी आता देवावरच हल्लाबोल केला पाहिजे, मूळावर घाव घातल्याखेरीज समाजाला लागलेली अंधश्रद्धेची कीड नष्ट करता येणे शक्य होणार नाही.

मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्यापैकी फारच कमी लोकांना स्वतःच्या सामर्थ्याची जाण झालेली असते. जे स्वतःला दुबळे, कमजोर समजतात तेच देवाला शरण जातात. वास्तविक पाहाता, देव नावाची कोणतीही शक्ती अस्तित्वात नसून, तो एक भ्रमआणि खूळ आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेते व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील फार मोठे नाव डॉ. श्रीरामलागू यांनी पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्ङ्गीिींेींर्शे देण्यात येणार्‍या ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरणप्रसंगी जे वक्तव्य केले, ते म्हणूनच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

डॉ. लागू म्हणाले होते, की परमेश्वराचे अस्तित्व ही सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. डोक्यात असणारे हे खूळ काढून टाकल्याशिवाय अंधश्रद्धेचे डोंगर हटविणे अशक्य आहे. अंनिसतर्ङ्गीिींेींर्शे यंदाचा ’सुधारक’कार पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांना डॉ. लागू यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. विद्या बाळ यांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान मोठे आहे.

परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे कामही चांगले आहे. या पुरस्काराच्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा खर्‍याअर्थाने गौरव झाला असे म्हणावे लागेल. या कार्यक्रमाला रजिया पटेल, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ. लागूंनी केलेले विवेंचन मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते म्हणाले होते, की धार्मिक आणि जातीय अस्मितेचे लढे तीव्र होत असताना, दुसरीकडे मात्र सामाजिक समतेचे लढे निष्पभ्र होत आहेत. भारतीय समाजात जातीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात असून, त्यासंदर्भातील लढे अधिक तीव्र होतात ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे, विवेकवादाचा पाया मजबूत करणे आवश्यक असताना, हा पाया ढिसाळ करण्याचे कामकाही माणसे हेतुपुरस्सर करत आहेत. आजची परिस्थिती काय आहे.

भारतीय समाज एकीकडे वैज्ञानिक प्रगतीच्या यशोशिखरावर असताना, दुसरीकडे या समाजाची मती अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडायला तयार नाही. पूर्वीच्या शारीरिक अंधश्रद्धा आता बहुतांश लोकांनी त्यागल्या असल्या तरी नव्या स्वरुपात मानगुटीवर बसणार्‍या बौद्धिक अंधश्रद्धा पाहता, आमचे आजही अंधश्रद्धेचे ग्रहण सुटले नाही, हा विचार व्युत्पन्न होतो. अंगारे, धुपारे घेणे हे आमची वैज्ञानिक बुद्धी, अंधश्रद्धा आहे असे म्हणते. परंतु, क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर गळ्यातील लॉकेटमध्ये गणपती आणि सत्यसाई बाबा यांची छायाचित्रे मिरवतो, तेव्हा सुज्ञ माणसेही या दोन छायाचित्रांतील संकल्पनेच्या आहारी जाण्याची प्रेरणा घेत असतात.

या समाजात संत आणि चमत्कारी पुरुष नेहमीच सामान्य माणसांवर प्रभाव टाकत आले आहेत. या संत किंवा बाबा मंडळींनी कधीही देवाचे अस्तित्व नाकारले नाही. उलटपक्षी देवाचे स्तोममाजविण्यात या मंडळींनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. या मंडळींनीच समाजावर अंधश्रद्धेचा पगडा बसविण्याचे पाप केले. समाजातील धर्मगुरू किंवा हिंदू समाजात ज्यांना भूदेव म्हणून ओळखले जाते त्या मंडळींवर भलेही काही संतांनी शाब्दिक प्रहार केले असतील, परंतु देवाचे अस्तित्व कायमठेवून झालेले हे प्रकार म्हणजे पाण्यावर ओढलेल्या रेघोट्याच होते. काही संतांनी अंधश्रद्ध बाबींवर भलेही त्यांच्या अभंगांतून टीकेचे आसूड ओढले असतील.

परंतु, अंधश्रद्धेचा पाया ज्या देव या संकल्पनेवर उभा राहिला आहे, त्या देवाचे खूळ डोक्यातून बाहेर काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. एक मंदीर बांधले तर भूदेवांच्या वंशातील दहा-पंधरा लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते. म्हणून, देव टिकला पाहिजेत, देव जगला पाहिजेत हा काही लोकांचा अट्टहास असतो. हा अट्टहास सामान्य माणसे समजून घेत नाही.

भूदेव म्हणणार्‍या मंडळींच्या पोटापाण्यासाठी देव ही संकल्पना प्रारंभी पुढे आली, दुर्देवाने आज ती भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ हिंदू धर्मातच ही संकल्पना आहे, असे म्हणता येणार नाही. सर्वच धर्मात ती अस्तित्वात आहे. जेथे धर्मगुरु असतो, तेथे देव असतो. कारण देव नसतील तर धर्मगुरुंची पोटे भरणार तरी कशी?

फारपूर्वी डॉ. श्रीरामलागू यांनी आता देवाला रिटायर करा, अशी मागणी केली होती. पुरोगामी चळवळीतील आणखी एक उर्ध्वयू दिवंगत निळू फुले यांनीदेखील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामकरताना, देवामुळे अंधश्रद्धेला बळकटी मिळते, ही बाब मान्य केली होती. देवाला रिटायर करण्याची प्रक्रिया आवश्यक असली तरी ती वेळखाऊ आहे. नवी पिढी विज्ञाननिष्ठ निपजेल आणि तिचा स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास बसेल, तेव्हा ती देवाच्या खुळातून स्वतःला मुक्त करुन घेईल.

तोपर्यंत देवाच्या रिटायरमेण्टवर प्रश्‍नचिन्हच आहे. देवाच्याविरोधात बोललेले फारसे कुणाला पचनी पडत नाही. कारण आज प्रत्येक जण हा या संकल्पनेच्या विविध माध्यमांतून आहारी गेला आहे. एकप्रकारची बौद्धिक गुलास्वतःहून स्विकारण्यात आली आहे. परंतु, सुजाण मानवी समाजनिर्मितीसाठी देव रिटायर करणे ही अत्यावश्यक बाब आहे. मानव हा त्याच्या बुद्धीचा फार कमी वापर करतो, असे भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक डॉ. एपीजे अब्दुल कलामयांनी सांगितले होते. मानव जेव्हा पूर्ण क्षमतेने बुद्धीचा वापर करण्यास शिकेल, तेव्हा निश्‍चितच प्रत्येकाच्या डोक्यातून देवाचे खूळ निघालेले असेल.

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड मेंदू पोखरण्याचे कामकरते. एकदा मेंदू पोखरला, की कुटुंब आणि समाज पोखरण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते. पूर्वीचेच अंधश्रद्धाळू आता आमची देवावर डोळस श्रद्धा आहे, असे म्हणू लागल्याचे दुर्देवी चित्र समाजात दिसते. देव हा कधीही अस्तित्वात नव्हता.

कोणीही तो अनुभवला नाही आणि पाहिलाही नाही. ज्यांनी देव पाहिला असा दावा केला असेल, त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. देव असेलच ना तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, गरिबी, दुःखी, पीडित माणसांच्या रुपात तो असेल. त्याची सेवा हीच ईश्‍वरसेवा, अशी विवेकानंदांना अपेक्षित असलेली कृतीशील ईश्‍वरनिष्ठा आता पुढे आली पाहिजेत. परंतु, आम्ही एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाला नैवेद्य अर्पण करतो, आणि दारी आलेल्या भिकार्‍याला पुढच्या दारी जा म्हणून सांगतो. जीव भावे शिव सेवा हा स्वामी विवेकानंदांचा देव असेल तर हा देव समाजाने का स्वीकारला नाही?

दगडांतील आणि मूर्तीतील देव आमच्या मानगुटीवर अद्यापही बसलेला कसा? या प्रश्‍नांची उत्तरे समाजाच्या मानगुटीवर देव बसविणार्‍यांनी देण्याची गरज आहे. खरे तर वैज्ञानिक प्रगती ही मानवी सामर्थ्याचे दृष्य प्रगटीकरण आहे. आकाशगंगेतील बहुतांश ग्रहांचा वेध घेतलेल्या माणसाला अद्याप स्वर्ग कुठे दिसला नाही. तो अस्तित्वात नसल्याने भविष्यातील अनेक अवकाश मोहिमांतूनही तो दिसणार नाही. परंतु, मेल्यानंतर तुला स्वर्ग पाहिजे असेल तर आता मला दान दे, असे सांगणार्‍या भामट्यांनी हा स्वर्ग कधीही समाजाच्या मेंदूतून बाहेर पडू दिला नाही.

जीवंतपणी दान देता देता भुकेकंगाल होऊन मरणारा माणूस तो स्वर्गात गेला का हे सांगू शकत नाही, हेच येथील काही भूदेवांच्या पथ्यावर पडत आले आहे. मानवी मेंदूच्या कल्पकतेतून संगणकाचा जन्मझाला, त्याने मेंदूची गतीशिलता वाढविली. परंतु, घरी संगणक आणल्यावर जोपर्यंत आपण त्याची पूजा करत बसू, तोपर्यंत आमच्या या मेंदूच्या अज्ञानाची किव करावी लागणार आहे. देवाचे अस्तित्व नाकारणार्‍याला नास्तिक म्हणून हीनवायचे आणि त्याच्या अंगावर दगडे फेकायची ही येथील समाजाची मानसिकता काहींनी निर्माण करून दिली आहे. ही मानसिकता आता बदलावी लागेल.

सहाव्या शतकात जेव्हा पायथागोरस हा पृथ्वी गोल आहे, हे सांगत होता; तेव्हा सर्वच धर्ममार्तंडांनी आणि तत्कालिन समाजाने त्याला मुर्खात काढले होते; त्याचे जीवन जगणे अवघड केले होते. परंतु, आज आपण सर्वच पृथ्वी गोल असल्याचे वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध करत आहोत. तीच परिस्थिती आज डॉ. श्रीरामलागू यांच्याबाबतीत लागू होते. देवाला रिटायर करा किंवा, डोक्यातून देवाचे खुळ काढा असे सागणारे डॉ. लागू आज भलेही समाजाला द्रुष्ट वाटत असतील.

परंतु, भविष्यात देवाचे खुळ डोक्यातून काढलेली पिढी निश्‍चितच जन्माला आलेली असेल, हा विश्‍वास ठेवू या!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?