माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा!

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा व त्यासाठी जीवाची बाजी लावा…

मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही.माझी पहिली खंत आहे की मी माझे जीवनकार्य पुर्ण करु शकलो नाही.मी आता जवळजवळ अपंग झालो असुन आजारपणामुळे आडवा पडलो आहे.मी जे काही मिळविले त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला पण त्यांचे विश्वासघातकी वागणे पाहील्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल.मला माझे लक्ष खेड्यातल्या लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते ते अजुनही हालअपेष्टा भोगत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदलली नाही पण आयुष्य फार थोडे शिल्लक राहीले आहे.मला असेही वाटत होते माझी सगळी पुस्तक माझ्या हयातीत प्रकाशीत व्हावीत पण पण मी असमर्थ व असहाय ठरत आहे ही नुसती कल्पना सुध्दा मला भयंकर क्लेशकारक होते.माझ्या ज्या सहका-याबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी ऐकमेकात भांडत आहेत त्यांच्या शिरावर येउ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्याच्या ध्यानिमनीही असल्याचे दिसत नाही.

नानकचंद तु माझ्या लोकांना सांग मी त्यांच्यासाठी जे काही मिळवुन देउ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळविले आहे ते करताना पिळवटुन टाकणा-या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला.वृत्तपत्रसृष्टीकडुन माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहीला.जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले त्यांच्याशीही मी दोन हात केले.हा काफला जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खुप सायास पडले .हा काफला असाच त्यांनी पुढे चालु ठेवावा.वाटेत अनेक अडथळे येतील अडचणी येतील अकल्पित संकटे कोसळतील पण वाटचाल सुरु ठेवावी.त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापुर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर त्यांनी हे आव्हान पेलायलाच पाहीजे.

जर माझे लोक हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरले तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे.कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरु देउ नये.हा माझा संदेश आहे.बहुदा हा शेवटचा संदेश आहे.मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते.

(डाॅ.बाबासाहेब आंबेडकर:अनुभव आणि आठवणी लेखक-नानकचंद रत्तु)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?