लातूर जिल्हा म्हटलं शिक्षण, सुशिक्षित लोकांचा जिल्हा, अर्थिक, शिक्षण, राजकारण , उद्योग या मध्ये लातूर जिल्ह्याने फार मोठ्ठी क्रांती केली आहे , आंबेडकरी चळवळ लातूर जिल्ह्य़ातील मजबूत चळवळ आहे , गेल्या दहा , पंधरा वर्षांत बौद्ध धम्माची धार्मिक चळवळ खूप मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे ,
आज स्थितीत
*काळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर*
या ठिकाणी पूज्य भंते महाविरो थेरो यांच्या प्रमुख प्रयत्नातून चार एक जागेत तक्षशीला बुद्ध विहाराची निर्मिती होत आहे , साधारण या ठिकाणी दोन कोटी पेक्षा जास्त खर्च करून विहार निर्माण करण्यात आले आहे , काळेगाव येथील बुद्ध विहारामुळे अनेक लोक धम्म चळवळीत सक्रिय आहेत.
*चैत्य स्मारक पानगाव*
लातूर जिल्ह्य़ातील पानगाव ह्या ठिकाणी ही व्हि.के आचार्य यांच्या प्रयत्नातून तीन एकर जागेत महाविहार निर्माण होत आहे , साधारण सहा सात कोटी रूपयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आनखीन पाच कोटी पेक्षा जास्त निधी विहार पूर्ण होण्यास लागू शकतो .
*सातकर्णि महाविहार लातूर*
लातूर शहरापासून जवळच पूज्य भंते पयानंद थेरो यांच्या प्रमुख प्रयत्नातून 9 एकर जागेत सातकर्णि महाविहाराची निर्मीती होत आहे , लोकांच्या सहकार्यातून साधारण 70 लाख रूपयांची जागा खरेदी केली आहे , लातूर जिल्ह्य़ातील हे एक मोठ्ठ बुद्ध विहार निर्माण होत आहे , हे विहार पूर्ण होण्यास साधारण तीनशे कोटी पेक्षा जास्त खर्च होऊ शकतो , शाळा ,काॅलेज, मेडिटेशन, संस्कार केंद्र या सर्व बाबींचा विचार पूज्य भंतेजी करत आहेत. कार्यक्रमाचं योग्य नियोजन लोकांशी असलेला संपर्क हि भंतेजींची खूप मोठ्ठी जमेची बाजू आहे ,
*महा बुद्ध विहार उदगीर*
पूज्य भंते नागसेन बोधी यांच्या मार्गदर्शना खाली व उपासक आमदार मंत्री संजय बनसोडे साहेब यांच्या प्रयत्नातून उदगीर तळवेस या ठिकाणी सहा कोटी रूपयांचे महाविहार बांधकाम होत आहे , साधारण 25% बांधकाम ही झालेले आहे ,
*तथागत बुद्ध गार्डन, बुद्ध विहार किल्लारी ता.औसा जि.लातूर*
पूज्य भंते धम्मसार यांच्या प्रयत्नातून भूकंपग्रस्त किल्लारी या ठिकाणी साधारण तीन एकर जागेत बुद्ध विहाराची निर्मिती होत आहे , हे ठिकाण नव्यानेच निर्माण होत आहे , पहिल्या धम्म परिषदेत अनेकांनी उपस्थिती दर्शवली आहे , या ठिकाणी भिख्खू निवास, बोअरवेल ची सोय करण्यात आली आहे लवकरच या ही ठिकाणी भव्य दिव्य महाविहार निर्माण होत आहे .
*तक्षशीला बुद्ध विहार औसा*
औसा शहरात आदरणीय उपासक राजेंद्र बनसोडे ( आबा ) यांच्या प्रयत्नातून चार एकर जागेत बुद्ध विहार निर्माण होत आहे , एक कोटी पेक्षा ही जास्त खर्च करून या ठिकाणी बुद्ध विहार बांधकाम झाले आहे , अनखीन या विहाराचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन ,चार कोटी लागणार आहेत .
*बुद्ध लेणी खरोसा*
लातूर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक वारसा , पर्यटन स्थळ, तीर्थ स्थळ म्हनजे बुद्ध लेणी खरोसा , बुद्ध लेणी च्या परीसरात महाबोधी लोकहिताय चॅरिटेबल ट्रस्ट ची पाच एकर जागा आहे या ठिकाणी ही महाविहार निर्माण होत आहे ,
*धम्मशील बुद्ध विहार निलंगा*
निलंगा शहरापासून जवळच धम्मशील महाविहार निर्माण होणार, आहे , बुद्ध विहार निर्माण व्हावे म्हनुन अनेक उपासक प्रयत्न करत आहेत , विहाराची दोन एकर जमीन आहे , 40/50 लाखाचे बांधकाम झालेले आहे .
✍️
भंते सुमेधजी नागसेन ( अध्यक्ष- महाबोधी लोकहिताय ट्रस्ट, लातूर/उस्मानाबाद )
9960498358
हि सर्व बुद्ध विहारे महाराष्ट्रातील सर्वांना प्रेरणा देणारी ठरणार आहेत ,