
चैत्यभुमीवर (दादर चौपाटी) नुकतेच एका नवीन आणि आलिशान व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून या डेकच्या उद्घाटनाची माहिती दिली होती. यासोबतच त्याची खासियतही त्यांनी सांगितली. या नवीन व्ह्यूइंग डेकमधून प्रतिष्ठित वांद्रे-वरळी सी लिंक दृश्यमान होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.


Mata Ramaai Viewing Deck inaugurated at #Chaityabhoomi, #Dadar!
चैत्यभूमी जवळील हा डेक “माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युईंग डेक” म्हणून ओळखला जाईल. पावसाचे पाणी समुद्रात सोडणाऱ्या वाहिनीवर BMC ने सुंदर व्ह्युईंग डेक उभारला आहे. आज याचे उद्घाटन झाले.