लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी!

 

स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मरणार्थ, दि.16 व 17 एप्रिल 2022 रोजी, लातूरच्या दयानंद सांस्कृतिक सांभागृहात, आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात उदघाटक मा. आनंदराज आंबेडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख पाहुणे डॉ.जनार्दन वाघमारे आदींच्या सोबतच, उदघाटन सोहळ्यात, प्रसिद्ध अभिनेत्री तथा ख्यातनाम नाटककार व कवयित्री, कविता मोरवणकर (मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबरच त्या निमंत्रितांच्या कविसंमेलनातही सहभागी होणार आहेत.

समारोपाच्याच्या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.रावसाहेब कसबे सरांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने मंतरलेल्या काळात संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी, आंबेडकरप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती!

प्रा. युवराज धसवाडीकर-स्वागताध्यक्ष

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?