बौद्ध समाज विकास महासंघ
पिंपरी चिंचवड
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
बौध्द समाज विकास महासंघाची सुरुवात संपूर्ण शहरातील बौध्द बांधव,विविध विहारे,संस्था, कार्यकर्ते यांच्यांत समन्वय साधनेसाठी त्यांचे मुळ कार्य चालू असतानांच एकत्रितपणे एकसंघपणे समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून केलेली आहे. या आपल्या संस्थेचे काम अधिक चांगले प्रभावी व्हावे यासाठी महासंघाच्या प्रशिक्षित महिला व पुरूष कार्यकर्त्यांची संख्या वाढून समाजाचे चांगले काम व्हावे. यासाठी फक्त निवडक लोकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.
आपणा सर्वांना माहीतच आहे की, कोणतीही चळवळ किंवा कोणतेही उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी त्यागी, समर्पित व प्रशिक्षित कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यांच्या योगदाना मुळेच सामाजिक कार्याची उद्दिष्टे पूर्ण करता येते.असे प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यासाठी बौद्ध समाज विकास महासंघाचे वतीने एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.
वरील शिबीरात संघटनात्मक संरचना, कार्यकर्त्यांचा बौद्धिक विकास घडविणे आणि कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक आस्था व समाज ॠण फेडण्याची भावना निर्माण करणेचा उद्देश आहे.
प्रशिक्षण स्थळ:-सायन्स सेंटर हॉल,एटोक्लस्टर समोर,पिंपरी.
दिनांक :-19/03/2023, रविवार
वेळ;-सकाळी 10 ते 4
(चहा,भोजन व्यवस्थेसह)
प्रशिक्षण शूल्क:-रू.150/-(अगाऊ नाव नोंदणी करून प्रशिक्षण शुल्क भरले असेल तरच प्रवेश दिला जाईल.)
नाव नोंदणीसाठी संपर्क…
*1.भाऊ डोळस मो.नं.*9822854031
*2.विजय गायकवाड मो.नं.*9011570174
*3.विशाल कांबळे मो.नं.*8446520520
हॉल मधील आसनक्षमता मर्यादित असल्याने,कृपया नाव नोंदणी शुक्रवार दिनांक 17/03/23 च्या संध्याकाळी पाच वाजेच्या आत करावी.
त्यानंतर ची नावे विचारात घेता येणार नाही.
तरी आपण सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा ही विनंती.
——
आपले….
बौध्द समाज विकास महासंघ, पिंपरी चिंचवड.















