बौद्ध विद्यार्थ्यांना बौद्ध म्हणून शाळेत नोंद करण्याच्या अडचणी दूर व्हाव्यात – अनिल वैद्य

अधूनमधून पालक मला फोन करतात की,शाळेत मुलाचा धर्म बौद्ध नोंद करायची आहे .पण अडचणी येत आहेत .काही शाळेवाले बौद्ध लिहत नाहीत इत्यादी तक्रार येत असते म्हणून ही पोस्ट लिहून जाहीर मागणी करीत आहे.
बौद्ध विद्यार्थ्यांना शाळेत नाव दाखल करताना किंवा नंतर धर्म व जातीच्या रकान्यात शाळेवाले आजही सांगतात की धर्म हिंदू लिहा व जात महार लिहा अन्यथा तुम्हाला सवलती मिळणार नाही. तसेच ज्या पालकांजवळ हिंदू माहार जातीचा दाखला आहे त्या पालकांस मुलाचा धर्म बौद्ध लिहायचा असेल तर अडवणूक करतात.
त्याला बौद्ध दाखला आना म्हणतात. अशा रीतीने बौद्ध धर्माच्या विद्यार्थ्यांना धर्म नोंद करतांना अडचणी येत आहेत.
धर्मांतरित बौद्धांना 1990 च्या संविधान अनुसूचित जाती सुधारणा आदेश या कायद्या नुसार अनुसूचित जातीच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही , त्यांच्या धर्मस्वातंत्र्याचे रक्षण व्हावे त्यांना धर्म बौद्ध सुलभ पणे नोंदविता यावा ,शाळेनी अडचण आणू नये .या साठी शिक्षण मंत्री व त्यांच्या विभागाने परिपत्रक काढावे.
समाज धुरीणांनी ही मागणी पूर्ण करून घ्यावी.
*अनिल वैद्य*
माजी न्यायाधीश
9डिसेंबर 2021

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?