महाराष्ट्र विधानसभा २०२४: नव निर्वाचित बौध्द आमदार!

जय भीम मित्रांनो,
महाराष्ट्र विधान सभा निवडणूक २०२४ चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. बलाढ्य पक्ष गारद झालेले आपण पाहत आहेत. महायुतीला जे राक्षसी बहुमत मिळाले आहे त्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. महायुती ने साम, दाम दंड भेद अशा अनेक युक्तीचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे असे बोलले जात आहे. त्यामध्ये ई.व्ही.एम चा पण गैरवापर करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. पण ई.व्ही.एम कशी हॅक करतात, हे नेमके कसे होते त्याविषयी चित्र स्पष्ट नसल्याने एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती नेहमी च विरोधकांना अंधारात ठेऊन हे कार्य करत असलेले आपण पाहत आलेलो आहोत.

पण ह्या वर्षीचा राज्यातील निकालावर नजर मारली तर महाविकास आघाडी सह इतर अनेक छोटे मोठे पक्षाचा सुफडा साफ झालेला आहे. वंचित आघाडी पण सत्ते पासून वंचित आहे. निवडणुकीसाठी उमेदवार थांबवून त्यांना निवडून आणण्याची प्रक्रिया वंचितला जमत नाही.

पण आजचा आपला जो विषय आहे कि जे काही प्रस्थापित पक्ष त्यातील निवडून आलेल्या आमदारापैकी किती आमदार आपल्या बौद्ध समाजाचे आहेत. ह्यावर आपण प्रकाश टाकूया.

आयु. नितीन काशिनाथ राऊत (नागपुर उत्तर)
आयु. राजकुमार सुदाम बडोले (अर्जुनी मोरगाव)
आयु. संजय बाबुराव बनसोडे (उदगीर)
आयु. संजय पांडुरंग शिरसाट (संभाजीनगर पश्चिम)
आयु. संजय नारायण मेश्राम (उमरेड)
डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (धारावी)
आयु. गजानन लवटे (दर्यापुर)
आयु. अण्णा दादुजी बनसोडे (पिंपरी)
आयु. सिध्दार्थ रामभाऊ खरात (मेहकर)
आयु. बालाजी प्रल्हाद किणीकर (अंबरनाथ)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ विधानसभा निवडणुकित विजयी सर्व बौद्ध आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढिल वाटचालिस मनस्वी शुभेच्छा.!

Image Source: dhammabharat.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?