मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी आम्हाला गुलामगिरीमधून मुक्त केले म्हणून हा आमचा “स्त्री मुक्ती दिन” समजल्या जातो.
काही मनुवादी या घटनेबद्दल गैरसमज पसरवून बाबासाहेबांच्या विषयी गैरसमज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न पडद्याआडून करत असतात. बाबासाहेब हिंदू धर्माचा द्वेष करणारे असते तर ते मनुस्मृती सोबत इतर महत्वाचे हिंदू ग्रंथ सुद्धा सहजपणे जाळू शकले असते.
असे काय होते “मनुस्मृति” मध्ये हे बघू या
1- नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-2 ते 6 पर्यंत.
2- पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये, विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-45
3- संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा “दास” आहेत,
स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही,
स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-416.
4- ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत,
म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-8 श्लोक-299
5- असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात,
शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार
नाही
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-66 आणि अध्याय-9 श्लोक-18.
6- स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.
(यामुळे म्हटल्या जाते-“नर्काचे द्वार”)
◆मनुस्मृती◆ अध्याय-11 श्लोक-36 आणि 37.
7- यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.
◆मनुस्मृती◆ अध्याय-4 श्लोक-205 आणि 206.
8- मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-214.
9 – स्त्री पुरुषांना दास बनवून
पदभ्रष्ट करणारी असते.
◆मनुस्मृती◆अध्याय-2 श्लोक-214
10 – स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-215
11. – स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-114.
12- स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-115.
13.- स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान,
इर्षाखोर, दुराचारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-17.
14.- सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
(1). स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-115.
(2). पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो, दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-154.
अश्या या गटारगंगा मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील शोषित पिडित बहूजन आणि सर्व जाती जमाती मधील स्रियांवरच नाही तर संपूर्ण भारतीयांवर अनंत उपकार केले आहेत म्हणूनच या पाशवी नियमांमधून सर्वांनाच मुक्ति मिळवून दिली आहे हे निर्विवाद सत्य आहे म्हणून हा खर्या अर्थाने “स्त्री मुक्ति दिन”, मानल्या जातो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?