डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस

मनुस्मृतीच्या काळात स्त्रीही बंदिस्त होती. तिचा जन्म झाल्यानंतर  सांभाळ वडिलांने करायचा, लग्नानंतर नवऱ्याने आणि वृद्ध झाल्यानंतर मुलांनी संभाळ करायचा. म्हणजेच महिला ही जन्म ते मृत्यूपर्यंत पुरुषांच्या छायेखाली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाचा फायदा खऱ्या अर्थाने देशातील सर्व सर्वधर्मीय महिलांना झाला. त्यांचे दुबळे जीवन नष्ट करुन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क मिळवून दिले. म्हणूनच खऱ्या अर्थाने हा महिलांचा जागतिक दिन म्हणने वेगळे ठरणार नाही.

हिंदू कोड बिल येण्यापूर्वी सर्व धर्मातील स्त्रिया ह्या बंदिस्त होत्या. तिला कुठलाच अधिकार नव्हता. जन्मापासून तिच्या मृत्युपर्यंत पुरुषांच्याच सावलिखाली राहिली. ही बाब डॉ. बाबासाहेबांना लक्षात आल्यानंतर त्यांनी संविधान निर्मिती कारतेवेळेस म्हणजे ते सन १९४६ मध्ये स्त्री ही शिक्षण आणि स्वतः कमविण्यासाठी मुक्त झाली पाहिजेत. एवढेच नाही तर कौटुंबिक वादातून तिची मुक्तता करणे आवश्यक होते. नवरा मृत्यू पावल्यानंतर सतीसारख्या वाईट प्रवृतीला नष्ट करण्यासाठी व महिलांना त्याचा फटका बसु नये या परंपरा खंडित करण्यासाठी व स्त्रीला पुरुषांबरोबर समान दर्जाचे जीवन जगता यावे, तिला शिक्षण घेता यावे, स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलणे, नोकरी करता यावी म्हणून हिंदू कोड बिल आणले. याच हिंदू कोड बिलनुसार आज पूर्ण भारत देशातील महिला ही ताठ मानेने जगत आहे.

हिंदू कोडबील मध्ये चार कायदे अंमलात आणले मुलाबरोबर स्त्रीलाही समान दर्जा मिळाला पाहिजे. वडीलाच्या संपत्तीमध्ये भावाबरोबरीचा हक्क दिला पाहिजे. या सर्व गोष्टी त्या बिलामध्ये समाविष्ठ असल्याने आज स्त्री ही सक्षम झाली आहे. एवढेच नाही तर त्या बिलात चार कायदे आणले. की, हिंदू मॅरेज ॲक्ट १९५०, दत्तक व उदरभरण कायदा, हिंदू वारसा कायदा, पालकत्व आणि मायनॉरिटी कायदा या कायद्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या. मुलाबरोबर तिला आपल्या पालकांच्या संपत्तीमध्ये किंवा वारसा हक्कांमध्ये सर्व अधिकार प्राप्त झाले.हिंदू कोडबीलामुळे देशातील सर्वोच्च पदावर महिला आज पोहचली आहे ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच अस म्हणायला काय हरकतच नाही.

ws7

महिलांच्या उद्दारासाठी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योगदान दिले ते महिलांसाठी न विसरणारे आहे. मनुस्मृतीच्या अध्याय 9 मधील श्लोक १८ मध्ये स्त्रीला शिक्षणाचा हक्क नाकारला होता. परंतु तो शिक्षणाचा हक्क हिंदू कोड बिल मध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी आणला आणि आज देशाच्या सर्वोच्च पदावर जसे की राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, पोलिस अधिकारी किरण बेदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जयललिता, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यासह आदी महिला देशाच्या महत्त्वाच्या पदावर राहून गेल्या असून काही कार्यरत आहेत.

 

 

देशातील सर्वधर्मीय महिला वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करण्याची गरज आजच्या काळात गरजेची आहेच पण त्याहूनही अधिक महत्वाचं आहे की देशातील तमाम महिला वर्गाणी बाबासाहेबांना वाचले पाहिजे हिंदू कोड बिल वाचले पाहिजे. त्यामुळे देशातील स्त्रियांना समजेल की बाबासाहेब यांनी काय काय योगदान देशातील स्त्रियांसाठी केले आहे. बाबासाहेबांच्या या कार्याला आज महिला दिनानिमित्य सलाम. जय भीम जय शिवराय जय संविधान जय शिवराय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?