माननीय हर्षदीप कांबळे जी, यांना मी तेव्हा पासुन ओळखते जेव्हा ते यवतमाळ येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी समाजासाठी तसेच तरुणांसाठी अत्यंत उल्लेखनीय काम केले जसे की मेळावे घेणे, शिबिर भरविणे जेणेकरून लोकांच्या व्यथा समजून घेऊन त्यांचे निराकरण व्हावे. ते यासाठी सतत कार्यरत असत. मेळाव्यांमध्ये वेग वेगळे स्टॉल साठी जागा उपलब्ध करुन देणे व त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे.
अश्याच एका मोठ्या कार्यक्रमात मला त्यानी ‘उद्योगरत्न’ म्हणून पुरस्कृत केले होते.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते लोकांचे हिरो होते. नंतर ते दिल्लीला भारत सरकारमध्ये समाज कल्याण सचिव म्हणून नियुक्त झाले. तिथे देखील त्यांनी समाजकल्याण सेक्रटरी म्हणून लोकहिताची व देशहिताची अनेक कामे केली. त्यानंतर ते परत मुंबईला आले व डेव्हलपमेन्ट कमिशनर, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री, महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत आहेत.
मला सांगताना आनंद होतो की, ते जरी सरकारी योजने अंतर्गत काम करत असले तरी देखील, ते अशा पद्धतींने काम करतात की आजचा जो तरुण वर्ग आहे त्यास उद्योजक बनवणे हेच त्यांचे परम कर्तव्य आहे.
ते अशा पद्धतींने काम करतात की जसे त्यांनी कामासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. गाव खेड्याचे तरुण असोत किंवा शहरी, त्यांच्या पर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचलाच पाहिजे. कोणताही तरुण हा बेराजगार राहता कामा नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. एवढेच नाही बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी थाइलँड येथील बौध्द कन्येबरोबर विवाह केला की जेणेकरून जास्तीत-जास्त बुद्धिझमवर काम करण्याची संधी मिळावी, एवढेच नाही, तसे करण्यामध्ये पूर्ण वेळ देता यावे म्हणून स्वत:चे मूल देखील होऊ न देण्याचा एक अतिशय कठिण आणि मोठा निर्णय त्यांनी घेतला.
औरंगाबाद इथे खूप मोठे बुद्ध विहारच उभारले तसेच बऱ्याच ॲक्टिविटीज् तिथे व्हाव्यात म्हणून ते कायम आग्रही असतात आणि आता ‘कोविड’ च्या बिकट परिस्थितीत ते स्वत:ला विसरून जाउन अहोरात्र जनकल्याणाच्या कामा करता वाहवून घेत आहेत. त्यांना त्यांचा वाढदिवस कधी आला आणि कधी गेला हे देखील कळले नाही!
अशा या महान व्यक्तिमत्वा बद्धल, ज्यानी आपले सर्वस्व देवून समजासाठी आणि देशासाठी अत्यंत निस्वार्थपाणे काम केले, मला सार्थ अभिमान आहे !!
तुम्हाला व तुमच्या निस्वार्थ
कामाला माझा सॅल्यूट “हर्षदीपजी” !!
आपली विश्वासु
पद्मश्री डॉ. कल्पना सरोज.