Dandashi Dand Bhidtana song Lyrics Anand Shinde | दंडाशी दंड भिडताना

  • Singer (गायक): आनंद शिंदे

  • Lyrics By (गीतकार): Zunjar Sakpal

  • Music By (संगीतकार): Pralhad Shinde

  • अल्बम: सोन्याची उगवली सकाळ (Soniyachi Ugavali Sakaal)

दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना

अन्याय शोधाया ही आग संघर्षाची
स्वामित्व मनी इतुके ती जिद्द आदर्शाची
ना संगिनी रणांगणी वैर्‍याशी झुंझतांना

दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना

चर्चिलची भाषा ती सदैव नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटीशाची
भीमरायाची सत्कार्याची पाऊले पडतांना
दंडाशी दंड भिडताना

नवा इतिहास घडताना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना

पुणे कराराची घुमताच ती नांदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
कुंकू हे माझे वाचवा संसार बुडतांना
दंडाशी दंड भिडताना

नवा इतिहास घडताना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना

वुष्विदिशादाही ऐसीच ही करणी
तव चरणाने नटली आकाश अन धरणी
झुंझारही नव ग्रंथाची पाने उघडताना
दंडाशी दंड भिडताना

नवा इतिहास घडताना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना