सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
सासू सुना असोवा अथवा त्या माय लेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी
एकात एक या रे बापात लेक जा रे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ
भीमशक्तीच हे पाणी वैर्याला आज दाऊ
मैदान गाजावा रे घरात बसता का रे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
अन्याय अत्याचार कोठेही आज होई
न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही
अन्याय या जगाचे वाहाती उलटे वारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
भीमा समान करण्या ते क्रांति आणि बंड
सांजया रणी उतरा तुम्ही थोपटूनी दंड
भीमाची आन घ्या रे रक्त हे सांडवा रे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे