Dhanya Ramai Bhimgeet Lyrics Anand Shinde | धन्य रमाई

आई विना माया या विश्वात नाही
सुखा धावतील सगळे दुखाला ती आई

भुकेल्या मुलांची दशा ताडूनी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

वस्तीगह धारवाडचे चालक वर्‍हाड
गहीवरे रमाई बघून भुकेली बाळ
विचारान ती गे वेढूनी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

वात्सल्याची मूर्ति दयाळू तीच मन
मुलापेक्षा मोठ ना मला सोन नान
वर्‍हाडी मामा त्या बाजारी धाडूनी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

भुकेल्या मुलांची या भागविण्या भूक
तृप्त करू बाळांना यात खरे सुख
शब्द मनास गेले भिडूणी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

जाहली अमर जगती किर्ति ठायी ठायी
रमाबाई ची झाली माता रमाई
गेलीया ईच नात जोडूणी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

भुकेल्या मुलांची दशा ताडूनी
बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढूनी
धन्य रमाई धन्य रमाई

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?