नाही कधीच पटणार नाही
ही मनधरनी चतुराई
बोले ठासून भीम त्या ठायी
जाव जमायचं आपलं नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
हा समाज विकणार नाही
शोधीयले मी कित्तेक धर्म स्थान
पर दिसले न आमचे कुठे कल्याण
नको ही आता शाश्वती आणि
नको ही तुमची ग्वाही
अरे नको ही तुमची ग्वाही
अश्या दिडदमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
हा समाज विकणार नाही
पाय उचलील तर करीन सर हा किल्ला
जर न झाला तर मरेल आंबेडकर हा
अन जगलो तर दाविल जगाला
करून पर्वत राई
अश्या दिडदमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
हा समाज विकणार नाही
मी पहिले चाळूनी धर्म ग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
या मार्गाने काशींनंदा
मुक्ति मिळे लवलाही
अश्या दिडदमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
हा समाज विकणार नाही
नाही कधीच पटणार नाही
ही मनधरनी चतुराई
बोले ठासून भीम त्या ठायी
जाव जमायचं आपलं नाही
अश्या दिडदमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही