माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
आठवता इतिहास येई ग्वाहीच बोलकी
येई ग्वाहीच बोलकी नाही हालकी पूलकी
आम्ही माणसं माणसं जणू सोनिया सारखी
जणू सोनिय सारखी माणुसकिलाच पारखी
मुकी रडण गावकी गावकी न म्हारकी
गावकी न म्हारकी होती आमुचि मालकी
पिढ्या पिढ्याच दुखणं नव्हतं एकल्या रातीच
नव्हतं एकल्या रातीच जाती रोगाच्या साथीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
एका भयाण रातीला ग्वाड सपान पडलं
ग्वाड सपान पडलं मन त्यातच गढल
काळनिजेला सारून तवा डोळ उघाडलं
तवा डोळ उघाडल देवदर्शन घडलं
मानवतेच्या भीमदुता भीतीन भुताली झाडल
जातीयतेच्या भूताला त्यान मातीत गाडल
तळागाळच्या मानसा तुला वरती काढलं
तुला वरती काढलं तुझ वजन वाढल
सुख दिनदुबळ्याच होत भीमाच्या हातीच
भीमा मूळ ह्या जातीला बळ आलया हत्तीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
भीम रस तोलावाचा भीम कडाडके इज
सनातण्याची भीमान केली हरामच नीज
मोठ्या मनान राखाया हिंदू धर्माची ती गुज
लिवल हिंदूकोड बिल नाही झालं त्याचं चीज
भीम बॉम्ब हायड्रोजन धुमधडाड आवाज
धुमधडाड आवाज गाजे सभा गोलमेज
गान भीमाच्या किर्तीच सार जन हे गातीत
सार जन हे गातीत पोट करून छातीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
भीम कोकणची शान भीम दक्खनाचा कणा
सांगे राज सियाजना छाती ठोकून पुन्हा पुन्हा
या देशाचा इतिहास भीमविना सुना सुना
देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना
बापू जाता तराजूत भीमा भारीच विद्वाणा
लिहून देशाची घटना दिला लोकशाहीचा दागिना
अरे काळ्याकाळपाच्या तुझ्या वाटोळ नीतीच
भीमासाठी तुझी कार अशी गुत्थिही तोतीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच