Jai Bheem Bolaaya Laaju Naka song Lyrics | जयभीम बोलाया लाजू नका | Anand Shinde

केलया माणूस ज्यान तुम्हाला
कारे विसरता त्या बाबा भीमाला
त्याच्याच कष्टाच आहे रे फळ हे
समृद्धी येताच माजू नका
जयभीम बोलाया लाजू नका

जीर्ण रूढीची करून होळी
घालवली तुमची भिकेची झोळी
सन्मान तुम्हाला मिळवून दिला
तुमचा भीमानच उद्धार केला
उपकार करत्याला विसरून तुम्ही
बेइमान होईन गाजू नका
जयभीम बोलाया लाजू नका

लपवून आपली लढाऊ जात
भलत्या सलत्याशी सांगता नात
समाज आठवून सवलती पुरता
गुपचुप येऊन कळपात शिरता
लबाड कोल्हयांनो आयत्या तव्यावर
येऊन पोळी भाजू नका
जयभीम बोलाया लाजू नका

स्वाभिमानान वाटे जगावं
सांगावं ठासून बापाच नाव
विनय सारखा सन्मान मिळल
हक्काचं नीळं ते निशाण मिळल
घडीत इकडून घडीत तिकडून
बनून ढोलक वाजू नका
जयभीम बोलाया लाजू नका

केलया माणूस ज्यान तुम्हाला
कारे विसरता त्या बाबा भीमाला
त्याच्याच कष्टाच आहे रे फळ हे
समृद्धी येताच माजू नका
जयभीम बोलाया लाजू नका

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?