माझ ऐकून घे ग लीला बुद्ध भीमाचा मार्ग भला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
बंद कर ग वेडा विचार सदा करतेस सगडे वार
देण्या दावती तुजला हुला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
का भरतेस तू ग परडी किती मेंढ्यांची तोडलीस नरडी
बट्टा कशाला आपल्या खूळा ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
नवस मागण सगडी भूल नाही देवाची चाहूल
तिथ पापाचा हाय ग झूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव अंगामधी काय असती तुझी तुलाच भावल मस्ती
का अंगलाट घेतेस बला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
बकरा कोंबड्यांचा ग स्वार्थ निंबू नारळाला नाही अर्थ
मनोहरान सल्ला दिला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
माझ ऐकून घे ग लीला बुद्ध भीमाचा मार्ग भला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला