Bhim Jayanti Aali Dharati aanande nhali song Lyrics Anand Shinde | भीम जयंती आली

भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

जिकडे तिकडे गुड्या पताका
थाट रोशनायिचा
चिली पिली अन नरनारीचा जोश हा नवलाईचा
भीम सोहळा दीपवी डोळा निळ्या आभाळा खाली
भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

करून पांढरा वेश निघाले
शिस्तीने नरणारी
बुद्धवंदना घुमू लागली सुरात बुद्ध विहारी
मना मोहवी धम्म बोली ती तथागटताची पाली
भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

समाजात या सदा लावली
माय पित्याची माया
कोटी कोटी हृदयी म्हणूणी विराजते भीमराया
त्या नावाला जपतो जारे करून छातीच्या ढाली
भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

भीम ज्ञानाचे तेज लाभता
विनय तुझ्या जीवनाला
मोल आले रे या भूवरती पहा तुझ्या कवणाला
स्पर्श होता भिम प्रतिभेचा
किर्ति हसली गाली
भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

भीम जयंती आली धरती आनंदे न्हाली
सजली अशी की जशी नववधू
साज नवा तो ल्याली

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?