किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…

*किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…*
*एक शीख आंदोलनकर्ता*

*जय जवान जय किसान*

ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे तो अगदीच असंविधानिक आहे.
मागील सत्तर दिवसांपासून शेतकरी कडक थंडी पावसात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी. शासनाने जे शेतकरी बिल पारित केले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. ज्या बिलाने शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही ते जर त्यांच्या न्यायासाठी आंदोलन करीत असले तर त्यांचा हा अपराध आहे का?
शासनाने शेतकऱ्यांच्या म्होरक्यांशी चर्चेच्या फेऱ्या घेतल्या मात्र अयशस्वी झाल्या. बिलावर फेरविचार करायला तयार नाही तर मागे घेणे दूरच राहिले.
अनेक अन्याय अत्याचार शेतकरी बॉर्डर वर सोसत आहे.
आधी मार्ग बंद केले. अश्रूधुर सोडले. पाणी मारले. एवढ्या कडाक्याच्या थंडीत जीवाचे रान करून न्यायाची मागणी करीत आहेत त्यांचे हाल हाल केल्या जात आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. कित्येक किसान शहीद झालेत. मग्रुर सरकार वरून अत्याचार करीत आहेत.
नेटवर्क बंद, वीज बंद, पाणी बंद. अशा परिस्थितीत महिला रस्त्यावर आल्यात तर त्यांच्या अंगावरून पाण्याचे टँकर चालवल्या गेले. शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्या जाते. एवढ्याने मन भरले नाही तर काटेरी तटबंदी केली. जणू काही सरकार विरुद्ध शेतकरी युद्ध सुरू आहे. हिटलरने सुध्दा अशीच तटबंदी केली होती.
देशभरातून सरकारची निंदा होत आहे. देश विदेशातून शेतकऱ्यांना समर्थन मिळत असले तरी सरकार मागे पाऊल घ्यायला तयार नाही. सरकार विरोधी आंदोलन म्हणजे सरकारचे अपयश होय. ते चिरडून टाकण्यासाठी वाट्टेल ते अमानुष प्रयोग सरकार करीत आहे.
देशात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. याचे या सरकारला सोयरसुतक नाही. काळजी आहे ती फक्त त्यांच्या चार पुंजीवादी चार मित्रांची. चार पुंजीवादी मित्रांसाठी आणि त्यांच्या संगनमताने देशाला त्यांच्या हवाली केले जात आहे. ज्या देशाला शेतकरी पोसतो त्या शेतकऱ्यांची इज्जत या देशात केल्या जात नसेल तर या देशातील सुजाण नागरिकांना नैतिकतेच्या गोष्टी सांगण्याचा काही अधिकार नाही.
शेतकऱ्यांची कोणती जात नसते. समस्त भारतीयांनी माझी न्यायाची लढाई म्हणून आंदोलनात सहभागी व्हायला हवे.
देश भांडवलदारांच्या हातात पूर्णपणे जात आहे. भांडवलशाही लोकशाही नष्ट करते हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल. लोकशाही टिकवायची असेल तर या भांडवलशाही, हिटलर शाही सरकार चा विरोध करावाच लागेल अन्यथा हेच शेवटचे आंदोलन म्हणून जन्मभर गुलामी स्वीकारावी लागेल.

शेतकरी बिलासारखेच शिक्षण नीती पारित केले आहे. परंतु शिक्षित वर्ग अजूनही याबाबतीत जागरूक झाला नसल्यामुळे शिक्षण नीती विरुद्ध आंदोलन उभे राहू शकले नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गतीब अधिक गरीब निर्माण करणाऱ्या या दोन्ही नीती आहेत. श्रीमंत आणि गरीब यातील दरी वाढवणाऱ्या या नीती निषेधार्थ आहेत. जातीव्यवस्था घट्ट करणाऱ्या पॉलिसी आहेत. समस्त श्रमकरी वर्गाला शिक्षणापासून वंचीत करून आर्थिक दुर्बल करणाऱ्या या दोन्ही पॉलिसी या शासनाने पारित केल्या आहेत. हे दोन्ही आंदोलन सोबत ताकतीने समोर आले तर हे हितलरशाही सरकारला पळता वाट सापडणार नाही आणि जागीच नेस्तनाबूत होऊ शकेल.
अन्यथा गुलामी नक्की आहे….

उज्वला गणवीर
नागपूर

*उठा नागरिकांनो…..*
*जय जवान… जय किसान….*

*जयभारत। जय संविधान। जय लोकशाही।*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?