धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर

औरंगाबाद – अडीच हजार वर्षानंतर थायलंड येथील महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थींचे दर्शन हे औरंगाबाद मधील तमाम अनुयायांना करण्यात आले. हजारोंच्या उपसकांच्या गर्दीत ही धम्मपदयात्रा परभणी येथून थायलंड मधील 110 बौद्ध भिक्खू आणि भारतीय बौद्ध भिक्खू यात सामील होते. परभणीतुन निघालेली पदयात्रा ही गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाली दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील केम्ब्रिज चौकातून ते तिसगाव या दरम्यान संपूर्ण रस्त्यांनी फुलांचा वर्षाव, जागोजागी रांगोळी काढून अनुयायांनी धम्मपदयात्रेचे स्वागत केलेलं दुसून आलं. औरंगाबाद येथील केम्ब्रिज चौकातील मुक्कामानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता तथागत बुद्धांच्या अस्थीकलशासह निघाली. सुंदर असा फुलांनी सजवलेला रथ आणि मागे भिख्खू यांच्या शिस्तप्रिय रांगेच्या परिसरातून अनुयायांच्या मुखातून “बुद्धम सरणं गच्छामि, धम्मम सरणं गच्छामि, संघम सरणं गच्छामि चा घोष करत अनुयायी रथाच्या मागे अगदी शिस्तीने धम्मपदयात्रेत चालत होती. संपूर्ण परिसर या घोषणा अगदी धम्ममय झाल्यासारखा वाटत होता. लहान मूल बाळ स्त्री पुरुष या सर्वांची गर्दी ही विलक्षणिय वाटत होती. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, संजय नगर, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रित चौक, जुने हायकोर्ट, LIC कार्यालय ते नगर नाक्यापर्यंत ठिकठिकाणी अनुयायांची अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती.
पदयात्रेत थायलंड येथील जागतिक गुरू लॉंगफूजी, भन्ते सोंगसेन फटफियन, भन्ते विचियान अबोत एम. सत्यपाल आणि आयोजक सिद्धार्थ हत्तीहंबीरे यांच्यासोबत समता सैनिक दलाचे सर्व स्त्री पुरुष जवान यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी धम्मपदयात्रेत सहभागी होते.
चिकलठाण्यातील माजी नगरसेवक रवी कावडे व बुद्धविहार समितीने धम्मपदयात्रेचे अगदी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. धम्मपदयात्रेला भरभरून प्रतिसाद औरंगाबाद व आजूबाजूच्या शहरातून मिळालेला दिसून आला.

*रामानगरतील धम्मदेसना

दुपारी 3 वाजे दरम्यान अस्थीकलश धम्मयात्रा ही रमा नगर परिसरात पोहचली, सकाळ पासूनच अनुयायांच्या गर्दीने परिसर अगदी भरून आलं होता. धम्मपदयात्रेचे स्वागत अगदी रस्त्यावर फुलाची चादर जागोजागी रोंगोळ्या काढून अस्थीकलशावर फुलांचा वर्षाव करून परिसरातील अनुयायांनी बौद्ध भिख्खूचं अगदी भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेऊन केले. पुढे मिलिंद बुद्धविहाराच्या परिसरातील सभामंडपात त्रिसरण पंचशील गाथा पठण केली, यावेळी धम्मदेसना ही केली. गगन मलिक यांनी प्रास्ताविक केले. याचवेळी आ. संजय शिरसाठ यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले व भिख्खू संघाचे स्वागत केलेलं दिसुन आले.
सिनेअभिनेता गगन मलिक यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले धम्मचक्र गतिमान करण्यासाठी थायलंड येथील बौद्ध भिख्खू संघ तथागथांची अस्थी घेऊन महाराष्ट्रात आला. ‘ परभणी ते चैत्यभूमी असा हा प्रवास 17 जानेवारीला सुरू झाला असून 15 फेब्रुवारीला चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. रामा नगर येथून गगन मलिक थायलंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण असल्या कारणाने ते थायलंड ला रवाना झाले असून, पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर परत ते धम्मपदयात्रेत सामील होणार आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?