मुंबई मधल्या नामांकित त्या
सिडनहेम कॉलेज मधी |
आंबेडकर हे नियुक्त झाले
प्राध्यापकाच्या पदी ||
नवे परिवर्तन करून गेला |
असा हा 32 डिग्रीवाला
नवे परिवर्तन करून गेला
असा हा 32 डिग्रीवाला ||
मॅरिटवरती समाज आणला
मॅरिटवरती समाज आणला आमच्या पदवीधरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
सुनाट भागाकार नको तो हक्कावर भांडतो
आज आम्ही आमच्या न्यायाचा गुणाकार मांडतो
सुनाट भागाकार नको तो हक्कावर भांडतो
आज आम्ही आमच्या न्यायाचा गुणाकार कार मांडतो
प्रश्न हजारो सोडविले हे प्रश्न हजारो सोडविले हे |
घटनेच्या उत्तरान ||
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
जात रुढी बेरीज चुकीची केली विषमता वजा
सम्यक समत्या बुद्धावाणी गंमत नाही तुझ्या
जात रुढी बेरीज चुकीची, केली क्षमता वजा
सम्यक समत्या बुद्धावाणी गंमत नाही तुझ्या
21 वर्ष मंथन केलं
21 वर्ष मंथन केलं ग्रंथामधलं पुराण
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
मनुवाद्याशी पटलं नाही, तिथंच घोड आडलं
युगायुगाच सुटलं नाही, कठीण गणित सोडलं |
मनवाद्याशी पटलं नाही, तिथंच घोड आडलं
युगायुगाच सुटलं नाही, कठीण गणित सोडलं ||
समता ममता सूत्र दिल हे
समता ममता सूत्र दिल हे त्रिसरणाच्या स्वरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
भीमरायाची क्रांती जेव्हा शांतिदुता भेटली
महार वाडाआम्ही सोडला दिल्ली ती गटली |
भीमरायाची क्रांती जेव्हा शांतिदुता भेटली
महार वाडा आम्ही सोडला दिल्ली ती गाटली
मतदानातून राजा सागर
मतदानातून राजा सागर केलय कालांतरानं
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
नवे परिवर्तन करून गेला
असा हा 32 डिग्रीवाला न
नवे परिवर्तन करून गेला
असा हा 32 डिग्रीवाला
मॅरिटवरती समाज आणला
मॅरिटवरती समाज आणला आमच्या पदवीधरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान
असं शिकवलं असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरान ||2||
गायक / संगीत : आनंद शिंदे
गीतकार: सागर पवार