भारत देश जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे..

भिक्खु अनालयो थेरो (थाईलँड)

लातूर/निलंगा,दि.११

बुध्दामुळे भारताची जगात विशेष ओळख आहे.भारत ही जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे.बौध्द धम्म हा वैश्विक धम्म आहे. बुध्दाची शिकवण ही करुणा, मैत्री आणि शांतीची आहे. बुध्दाच्या नीतीशास्त्राने जगाचे कल्याण होईल. असे प्रतिपादन बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावण पौर्णिमे निमित्त धम्मदेशना आणि संघदान कार्यक्रमाचे आयोजन महाविहार सातकर्णी नगर, रामेगाव ता.जि.लातूर येथे करण्यात आले होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात थायलँड येथील भिक्खु संघ आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची दिपाने , पुष्पाने पूजा करून बुध्द वंदनेने करण्यात आली.
यावेळी सर्व भिक्खु संघ आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पौर्णिमेच्या विशेष प्रसंगाने थाई भिक्खु संघाने परित्राण पाठ केले. यावेळी प्रमुख धम्मदेशना देताना भंतेजी पुढे म्हणाले की, तथागत बुध्द आणि त्यांच्या धम्मामुळे जगावर अनंत उपकार आहेत. बुध्दाची शांती व करुणा मैत्री ही जगाला मिळालेली महान अशी अमूल्य देणगी आहे.असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, धाराशिव जि.म.स. बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलाश शिंदे यांची शुभेच्छापर मनोगत संपन्न झाली. यावेळी देवानंद मानखेडकर, प्रा. देवदत्त सावंत, राजे साहेब सवाई, सुरेश कालेकर, संजय माकेगावकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक भिक्खु पय्यानंद थेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्व विशद केले आणि बुध्दाच्या नैतिक जीवन मार्गाचे अनुपालन प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे. आचरणशील बौध्द अनुयायी व्हावे असेही आवाहन भंतेजी पय्यानंद थेरो यांनी केले. यावेळी थाईलँड येथील भिक्खु संघाला भारतीय बौध्द अनुयायांच्यावतीने जीवन आवश्यक वस्तूंचे संघदान करण्यात आले. महिला मंडळाच्यावतीने सर्व उपस्थितीतांना भोजनदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव कांबळे व सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भंते बोधीराज, उदय सोनवने, मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, पांडुरंग अंबुलगेकर, विलास अवशंक, प्रा. विश्वनाथ आल्टे, प्रा. सतिश कांबळे, संतोष कसबे, सतीश मस्के, अनिरुध्द बनसोडे, परमेश्वर आदमाने यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी एम.एन.गायकवाड, जी.एस.साबळे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, सुशील चिकटे, भीमराव चौदंते, सिद्धार्थ सूर्यवंशी, राजकुमार गंडले, कुमार सोनकांबळे, विनोद कोल्हे, शकुंतला नेत्रगांवकर, अनुसया कांबळे, बेबी कांबळे, मीना कदम, शोभा बामणीकर, सुजाता अजनीकर, कालिंदा किवंडे, शोभा महालिंगे, सुमन गायकवाड, वंदना गायकवाड रंजना, ललिता सवाई, कोकाटे, वर्षा कांबळे, विद्या ससाणे, निर्मला थोटे, ललिता गायकवाड, शोभा सोनकांबळे, पंचशीला बनसोडे, विद्या सुरवसे, सुनंदा गायकवाड, अनिता गायकवाड, कमल गाडे, रंजना कोकाटे, ई सह मोठ्या संख्येने बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?