अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला काय दिलं?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक आणि कामगार व वंचित वर्गाचे खरे रक्षक होते. त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत झाला आणि कामगारांना हक्क, सुरक्षा आणि सन्मान मिळाला. त्यांचे योगदान इतके व्यापक आहे की ते काही मुद्द्यांत मांडता येईल:

१. कामगारांना मूलभूत सेवा व सुविधा मिळवून दिल्या.
२. कामगार राज्य विमा योजना (ESI) लागू केली.
३. कामाचा दिवस १२ तासांवरून ८ तासांवर आणला.
४. कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता दिली.
५. भरपगारी रजा (Paid Leave) मिळवून दिल्या.
६. महागाई भत्ता (Dearness Allowance) सुरू केला.
७. कायदेशीर संपाचा अधिकार (Right to Strike) दिला.
८. आरोग्य विमा योजना लागू केली.
९. कामगार कल्याण निधी (Labour Welfare Fund) सुरू केला.
१०. निर्वाह निधी (Provident Fund) ची तरतूद केली.
११. पालकत्वाचा अधिकार (Parental Rights) मिळवून दिला.
१२. घटस्फोटाचा अधिकार (Right to Divorce) महिलांना दिला.
१३. प्रसूती पगारी रजा (Paid Maternity Leave) सुरू केली.
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार कायदेशीर केला.
१५. समान कामासाठी समान वेतनाचा अधिकार दिला.
१६. वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान अधिकार मिळवून दिला.
१७. महिला कामगार संरक्षण कायदा (Women Labour Protection Act) लागू केला.
१८. मतदानाचा सार्वत्रिक अधिकार (Universal Adult Franchise) लागू केला.
१९. भारतीय सांख्यिकी कायदा (Indian Statistical Law) राबवला.
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (Technical Training Scheme) सुरू केली.
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (Central Technical Power Board) स्थापन केली.
२२. विद्युत जोड प्रकल्प (Power Grid System) उभारला.
२३. राज्य विभागणी आयोग (State Division Commission) स्थापन केला.
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग (Central Water Irrigation Commission) स्थापन केला.
२५. अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी वित्त आयोग (Finance Commission) सुरू केला.
२६. नदी जोड प्रकल्प (River Link Project) योजनेची संकल्पना मांडली.
२७. दामोदर खोरे प्रकल्प (Damodar Valley Project) सुरू केला.
२८. हिराकुंड धरण (Hirakud Dam) उभारलं.
२९. भाक्रा-नांगल धरण (Bhakra-Nangal Dam) उभारलं.
३०. सोनेक नदी प्रकल्प (Son River Project) राबवला.
३१. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) स्थापनेत योगदान दिलं.
३२. रोजगार विनिमय कार्यालये (Employment Exchange) सुरू केली.

डॉ. आंबेडकरांनी केलेल्या या ऐतिहासिक कामामुळे भारतातील कामगार, शेतकरी, महिला आणि वंचित घटक यांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर बळकटी मिळाली. त्यांचं योगदान हे केवळ राज्यघटनेपुरतं मर्यादित नसून, देशाच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?