डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी!

१२ एप्रिल २०२५ रोजी वरळीतील जांबोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा होणार आहे. याच दिवशी भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा सोहळाही पार पडेल. यावेळी १३४ किलोचा मोठा केक, आकर्षक आतषबाजी आणि प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम यामुळे सोहळा उजळणार आहे.

विशेष आकर्षणे:

  • १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे संगीतमय गायन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न.
  • बॉलिवूड कलाकार अनन्या तांबे, भारत गणेशपुरे, रूपकुमार राठोड, संजय सावंत यांची मनोहर सादरीकरणे.
  • लाखो रुपयांची बक्षिसे (पैठणी, सोने, चांदी, शालेय साहित्य इ.) लकी ड्रॉद्वारे वाटण्यात येणार.
  • गरीब मुलांसाठी ‘समता चषक २०२५’ बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन.

हे उत्सव भिमोत्सव समन्वय समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रंगवले जात आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा, असे आयोजक डॉ. विजय कदम यांनी आवाहन केले आहे.

📍 ठिकाण: जांबोरी मैदान, वरळी
📅 दिनांक: १२ एप्रिल २०२५ (शनिवार)
⏰ वेळ: संध्याकाळी ५ वाजता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?