chaityabhoomi3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी रात्री १२ वाजे पर्यंत लाऊड स्पिकर लावता येणार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट आहे.
सर्व आंबेडकर अनुयायी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना आहे की,
केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार विविध तरतुदीनुसार विविध जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराचे वर्षभरातील 15 दिवस प्रत्येक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निश्चित केले आहेत. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे. त्यानुसार ध्वनी प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1 दिवस) असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर झालेली आहे.त्यामुळे रात्री 12 पर्यंत साउंड वाजवता येते.
अशी सवलत देताना अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी घालण्यात याव्यात. तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापराबाबतची सवलत 15 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही. राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्र नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची परवानगी देताना ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. त्यानुसार 2021 मधील विविध जिल्ह्यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे.
या दिवसांसाठी दिली सूट
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत सूट दिलेले दिवस असे : शिवजयंती (1 दिवस), ईद- ए- मिलाद (1 दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1 दिवस), 1 मे महाराष्ट्र दिवस (1 दिवस), गणपती उत्सव (4 दिवस, पाचवा, सातवा, नववा दिवस व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव (2 दिवस, अष्टमी व नवमी), दिवाळी (1 दिवस), ख्रिसमस (1 दिवस), 31 डिसेंबर (1 दिवस). उर्वरीत तीन दिवसांबाबतची परवानगी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार दिली जाते.त्यासाठी 7 एप्रिल 2003 आणि 5 सप्टेंबर 2016 ला शासनाने शासन निर्णय काढले आहेत.
…तर कारवाई होणार
केंद्र सरकारच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणसंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदूषण नियम 2000 चे पालन करण्यात यावे.
सदर नियमानुसार उत्सव आणि लग्न सोहळ्यात निवासी भागात
(sic) 55 Decibel दिवसा तर 45 Decibel रात्रीच्या वेळी , शांतता क्षेत्रात 50 Decibel दिवसा आणि 40 Decibel at रात्रीच्या वेळी, औद्योगिक क्षेत्रात 65 Decibel दिवसा आणी 55 Decibel रात्रीच्या वेळी तसेच औद्योगिक क्षेत्रात (sic) 75 Decibel दिवसा आणि 70
रात्रीच्या वेळी असे बंधन घातले आहे.तसा तक्ता Noise Pollution Regulation and Control Rule, 2000.”
मध्ये जोडला आहे.
नियमातील कोणत्याही तरतुदींचा भंग झाल्याचे आढळून आल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये कारवाईस संबंधित पात्र असतात त्यामुळे जयंतीनिमित्त मिरवणूक काढणारे किंवा कार्यक्रम आयोजित करणारे ह्यांनी नुसता डीजे ची परवानगी मागू नये.तर वरिल मर्यादेत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराची परवानगी मागावी.आणि आवाजाची मर्यादा वरील प्रमाणे ठेवल्यास कुणीही कार्यवाही करू शकत नाही.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?