डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्व साहित्य आम्ही PDF च्या माध्यमातून ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचा लाभ अनेकांना झालेला आहे. आतापर्यंत आमची वेबसाईट www.brambedkar.in च्या माध्यमातून अनेकांनी ह्या संधीचा फायदा घेतलेला आहे.
आपल्या समाजात अशी अनेक लोक आहेत ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचण्याची खुप आवड आहे, पण आपल्यातील काही वयो वृध्द मंडळी जी अगोदरच्या काळात शिकलेली नाहीत, ज्यांना वृद्धापकाळामुळे डोळ्यांना दिसत नाही. जे आपल्यातील काही बांधव जे अंध आहेत अशा लोकांना पण डॉ. बाबासाहेब यांचे ग्रंथ ऐकायला मिळणार आहेत.
ऑडिओ बुक ची संकल्पना आम्ही राबवत आहोत. आम्ही सध्या डॉ. बाबासाहेंबानी लिहलेले ३ ग्रंथ आपल्या साठी ऑडिओ फॉर्म मध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१. बुध्द आणि त्यांचा धम्म
२. मुक्ती कोण पथे?
३. शूद्र पूर्वी कोण होते ?
अनेकांच्या फायद्यासाठी कृपया ह्या माहितीचा प्रचार आणि प्रसार करावा ही नम्र विनंती.
जय भीम
ऍडमिन
www.brambedkar.in