मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत!
*_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.*
*आणि_ वाचणारी माणसं नाचणार नाहीत, पण आपल्या वाचनाच्या जोरावर, लेखणीच्या तालावर इतरांना नाचवतील।*
तथागत शत्रांनेही नव्हे आणि शास्त्रानेही नव्हे केवळ वाणीने आणि बोलण्याचे क्रांती करणारे गौतम बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही. मी दाखवलेल्या मार्गाने जर तुम्ही वाटचाल केलीत तर तुमचे निश्चित कल्याण होईल.तुम्हाला निब्बान पद प्राप्त होईल.आपल्या आचारांची आणि विचारांची जगावर छाप टाकणारे, जगातील महान विद्वानांपैकी पहिल्या क्रमांकाचे विद्वान ,हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या व्यवस्थेला सुरुंग लावणारे मुक्यांचे नायक, वेदशात्र संपन्न (वे.शा.संपन्न) असणार्यांना रस्त्यावर लोळवून संशोधन, ज्ञान, बुद्धिमत्ता,तत्वज्ञानाच्या शिखरावर पोहचणारे विश्वभुषण भारतरत्न युगप्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुमच्यासारखाच माणुस आहे.ज्या हालअपेष्टा, दु:ख,वेदना, यातना तुम्ही सोसल्या त्या मी सुद्धा सोसल्या आहेत यामध्ये तिळमात्र शंका नाही. म्हणजे वरील महामानच म्हणतात की आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहोत.तरीही लोकं त्यांना देवासारखे मानायला लागले.मनुवाद्यांच्या काल्पनिक देवतांचे जसे पुजन होते तसे पुजन बहुजन या महापुरुषांचे करायला लागले याला काय म्हणावे ? वरील महामानव बहुजनांसाठी पुजनीय नक्कीच आहेत पण देव नाहीत.कारण जिथे व्यक्तीपुजा होते तेथे विचार संपतात आणि जिथे विचार संपतात तेथे महापुरुष संपतात.आपण विचार पुजक असलो पाहिजे म्हणजे विचार प्रगल्भ होतात.विचार प्रगल्भ झाले की महापुरुष अमर राहतात.
आज लोकांना तथागत बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार माहीत नाही त्यांना फ़क्त एवढंच माहीत आहे की आम्ही बाबासाहेबांमुळेच सुखाने जगत आहोत.वरील लोक महापुरुषांची विचारधारा संपविण्याचे काम करत असतात.आपण बाबासाहेबांनी जयंती साजरी करतो.पण नुसतीच जयंतीसाजरी करण्यापेक्षा त्या दिवशी त्यांचा एक विचार समाजात पेरला तर त्यांच्यासाठी खरी जयंती साजरी होईल.आपण नकळत महापुरुषांच्या विचारांचे खूण करण्याचे काम करत आहोत हे बंद झाले पाहिजे.त्यांची पुजा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे.या देशात समता,स्वातंत्र् य,बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब आटविला पाहिजे.त्यासाठी बाबांचे लिखीत पुस्तके किंवा त्यांच्या जीवनावरील साहित्य वाचले पाहिजे.आम्हाला बाबासाहेबांचे भक्त नाही तर सच्चे अनुयायी बनायचे आहे.भक्त महापुरूषांच्या विचारधारेला मागे नेण्याचे काम करत असतात तर अनुयायी महापुरुषांच्या विचाधारेला पुढे नेण्याचे कार्य करत असतात.
तथागत बुद्धांना बोधी प्राप्ती झाली तेंव्हा तथागत बुद्धांनी पाच लोकांना धम्म सांगितला आणि त्याच पाच लोकांना धम्माची दिक्षा दिली.सद्धम्म शिकवण्यामागे तथागत बुद्धांचा महाविशाल असा द्रुष्टीकोण होता.तथागत बुद्धांनी जीवंतपणी पाच लाख लोकांचा संघ तयार केला.अनुयायी तर वेगळेच.डॉ.बाबासाहेबांनी १४ ऑक्टॊबर १९५६ रोजी एकाच वेळी पाच लाख लोकांना दिक्षा दिली त्यांचे अनुयायी किती पाहिजे होते ? हा प्रश्न अजुन तरी अनुत्तरीतच आहे.का झाले नाही ? कारण गेल्यानंतर आमच्यात भक्त निर्माण झाले, अनुयायी नाही.भक्त नेमही महापुरुषांच्या विचारांना संपविण्याचे काम करत असतात.आम्ही सर्व क्षेत्रात मागे पडत आहोत.सामाजिक,धार्मिक,आर्थिक या क्षेत्रात आम्ही संपलेले आहोत किती ही शिकांतिका आहे समाजाची ?
मुल जन्माला आले की बाबासाहेबांचा मोठ्या गोडगळ्याने पाळणा म्हणतात,नाव ठेवताना धम्मानुरुप नाव ठेवतात,लग्न लावताना बाबासाहेबांचा जयजयकार करतात,समाजावर अन्याय झाला की मोर्चा,आंदोलन निघताना बाबासाहेबांचा जयजयकार करतात,बाबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की बासाहेबांसाठी
काहीही करायला आम्ही तयार असतो.बाबासाहेबांचा जयजयकार करण्यामध्ये आम्ही तल्लीन असतो,उठता बसता जय भिम म्हणण्यामध्ये आम्ही थकत नाही,महाडला जातो,महुला जातो,दिक्षा भुमीवर जातो,चैतन्यभुमीवर जातो.बाबासाहेब म्हणजे आमचा जीव की प्राण असे वेळोवेळी म्हणत असतो. आम्ही बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही.मात्र त्यावेळी खूप राग येतो जेंव्हा जीवन भर बहुजनवादी असणारे लोक ऐन वेळेला ब्राह्मणवादी चेलेचपाट्यांना पाठीशी घालतात.एवढी नालायक विचारसरणी मी जगाच्या इतिहासात पाहिली नाही. असेच लोक ब्राह्मणवादी आहेत असे नाही तर ज्यांना देशामध्ये समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय प्रस्थापित होऊ नये असे ज्यांना वाटते ते सर्वच ब्राह्मणवादी आहेत.या देशात घटना बाबांसाहेबांची आहे तरी हा देश बाबांसाहेबांच्य ा घटनेप्रमाणे कमी आणि ब्राह्मणवाद्यां च्या तत्वज्ञानावर चालत आहे.देश बाबांच्या घटनेनुसार चालत असता तर या देशामध्ये समता,स्वातंत्र् य,बंधुता आणि न्याय ही तत्वे प्रस्थापित झाली असती.एवढी भयानक विषमता राहीली नसती.ज्या देशांनी तथागत बुद्ध व बाबांसाहेबांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला ते देश महासत्ताक झाले.भारतात अमाप जाती आहेत.त्यांच्या मुलभुत गरजा पुर्ण झाल्या नाहीत,तो देश महासत्ता काय बनणार ?
बाबासाहेब म्हणतात की या देशात जोपर्यंत जाती विरहीत समाज रचना तयार होत नाही तोपर्यंत या देशाचा कोणतात विकास होणार नाही.ही काळ्या दगडावरची रेष आहे. या देशात फ़क्त दोनच विचारसरणी आहेत.१) ब्राह्मणवादी आणि २) बहुजनवादी विचारसरणी.त्यालाच म्हणतात ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद.मानवता वादी,समाजवादी विचार म्हणजे बहुजनवाद आणि मानवतावादाचे कट्टर विरोधक म्हणजे ब्राह्मणवाद.बहुजनवाद ह दुध प्राशन केल्यासारखे आहे आणि ब्राह्मणवाद दारू ढोसल्यासमान.दुधाचे परीणाम उशीरा दिसतात पण कायम टिकणारे असतात.पण लोकांना उशीरा दिसणारे परिणाम मान्य नाही तात्काळ परिणाम पाहिजे.म्हणून लोकं दारू पिणे पसंत करतात.ब्राह्मणवादाने आजपर्यंत समाजाचा सत्यानाश केला आहे.आम्ही आत्मविश्वास गमावलेला आहे.बाबासाहेब म्हणतात की,आत्मविश्वासाइतकी मोठी शक्ती कोणतीच नाही.असा आत्मविश्वास आमच्याकडे राहिलेला नाही. विश्ववंद्य शिवरायांच्या काळात दोन प्रकारचे मावळे होते.प्रस्थापित मावळे आणि विस्थापित मावळे.प्रस्थापित मावळे म्हणजे धनद्रव्याने संपन्न लोक आणि विस्थापित मावळे म्हणजे परिस्थितीने गरीब लोक.प्रस्थापित लोक मोघलांची चाकरी करायचे गरीब भावंडांशी त्यांचा काही संबंध नव्हता पण स्वराज्य स्थापनेमुळे शिवरायांनी प्रस्थापितांच्या वतनदार्या,जहागिर्या बंद केल्या. तेच प्रस्थापित त्याकाळचे ब्राह्मणवादी म्हणने वावगे ठरणार नाही.
डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर समाजात दोन प्रकारचे बौद्ध तयार झाले.एक प्रस्थापित बहुजन आणि दुसरे विस्थापित बहुजन.प्रस्थापित बहुजन ब्राह्मणवादाने बरबटले आहेत तर विस्थापित हे बहुजन चळवळीचे महान कार्य करत आहेत.ब्राह्मणवादाला विरोध हा सर्वच बहुजनांनी करायला हवा पण तसे होत नाही.भटाळलेल्यांना थार्यावर आणले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.उलट ब्राह्मणवाद्यां च्या भडव्यांचा,दलालांचा,चमच्यांचा,लाळ घोटणार्यांचा सत्कार बहुजनच
करतात.आम्हाला ज्यांच्याबद्दल चिड यायला पाहिजे त्यांचा आम्ही आदर करत आहोत.ज्यांना लाथा घालायला हव्यात त्यांच्या पाया पडत आहोत.याचाच अर्थ असा आहे की आम्ही आमच्यातील मित्र आणि शत्रू ओळखू शकलेलो नाही.जातीचे बनवण्यापेक्षा विचारांचे लोक बनवा.यातच सर्व बहुजन समाजाचा उद्धार आहे.म्हणून म्हणावेसे वाटते की समाज महापुरुषांना मानतो पण महापुरुषांच्या विचारांना मानत नाही.आता तरी बहुजन समाजाने आत्मचिंतन करावे.
नमो बुद्धाय, जय भिम.