गेल्या कित्येक वर्षा पासुन आपल्या उद्धारकर्त्या बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास देशभरातील अनेक भीमसैनिक चैत्यभूमीवर येत असतात. त्याच प्रमाणे याही वर्षी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर महाराष्ट्रातून तसेच देशभरातून गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. रक्ताचा एक थेंबही ही न सांडू देता अशी क्रांती करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वाना हे वैभव प्राप्त करून देऊन गेला. खरंच त्यांचे ऋण फिटता फिटणारे नाहीत. ६ डिसेंबर १९५६ दिनी दिन दलितांचा कैवारी आपल्यातून निघून गेला, आयुष्यभर ज्या व्यवस्थेने ह्या महामानवाला छळले त्यांना सुध्दा प्रेमाने लोकशाही बहाल करून सर्वांप्रती असीम करुणेचा मंत्र देऊन बाबाने खरेच आम्हाला किती धन्य केले. आणि त्याहूनही श्रेष्ठ असा बुद्धांचा धम्म तुम्हा आम्हा देऊन गेले. किती थोर उपकार बाबांचे आपल्यावर.
ह्या भावनेने असंख्य भीम सैनिक माता भगिनी मुंबई स्थित चैत्यभूमीवर लोक येत असतात.