समाजाचा पोशाख कसा असावा याबाबत बाबासाहेब मार्गदर्शन करताना म्हणतात की,” आपल्या समाजातील स्त्री पुरुषांच्या पोषाखात अलीकडे पुष्कळ चांगला बदल झालेला आहे. याबद्दल मला समाधान वाटते मात्र जुन्या बायांच्या पोशाखात अद्याप बदल व्हावयास पाहिजे.त्यांना झंपर – पोलकी असा नवा पोशाख वापरणे आवडत नसेल तर त्यांनी तो वापरू नये. मात्र चोळी लुगडी असा जूनास पोषाख वापरायचा असेल तर तो व्यवस्थित वापरावा.पोशाख भारी किमतीचा पाहिजे, असे माझे म्हणणे नाही.मात्र व्यवस्थित पाहिजे. *आपल्या पोषाखा वरून आपण अमुक एका जातीचे आहोत असे ओळखता येता कामा नये.* ( 29 मे 1953 रोजीच्या चेंबूर येथील भाषणातून)
आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी इतकी बारीक गोष्टी पाहणारी माणसे दुर्मिळ असतात.त्यातलेच बाबासाहेब हे एक आहेत.