महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची भेट झाली. आभाळा एवढी अफाट उंची असलेले निधड्या छातीच्या बेडर महामानव यांची भेट ही अविस्मरणीय आहे. 1919 ला माणगांवच्या परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य शाहू महाराजांनी आरंभिल्याबद्धल अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा.”
शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी का करावी? शाहू महाराजांना मनो-मन मान्य होते की, मागे राहिलेल्या बहुजन लोकांचा उद्धार जर काही करू शकेल तर ते शिक्षण होय. म्हणून शाहू महाराजांनी 1909 साली एक आदेश काढला त्यात महाराज म्हणतात, “सर्व मागासलेल्या लोकांची स्थिती विद्याप्रसाराशिवाय दुसरे साधन नाही.” शाहू महाराजांनी रात्र शाळा सुरू केल्या. 1907 ला मुलींच्या शाळेस मंजुरी दिली. मोफत शिक्षण, मोफत वह्या, पुस्तके तसेच शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली.
शाहू महाराज आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणकरिता अहोरात्र प्रयत्न करीत होते. प्रजेच्या सुख-दु:खात महाराज सहभागी असायचे. इतिहासातील एक प्रजादक्ष राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा आजही आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले. शाहू महाराज हे वसतिगृहांचे जनक आहेत. हुशार, होतकरू, निराधार विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आलेत. शाहू महाराज जातीभेद उच्चाटन सुरू करणारे महापुरुष होते. 1894 ला तमाम जनतेच्या हितासाठी-उद्धारासाठी जाहीरनामा काढला. 1908 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वासतिगृहांची स्थापना केली. 1911 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला. 1912 ला एका जाहीरनाम्यात प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य केले. 1918 साली महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आदेश काढला. म्हणून महान चरित्रकार धनंजय कीर शाहू महाराजांबद्दल म्हणतात, “नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत..!”
टीम लेखणी चळवळीची सर्वाना आव्हान करते की, शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी. गरजू विद्यार्थ्यांना पेन-पुस्तके-वह्या-आर्थिक मदत करावी. महाराजांनी वसतिगृहे काढलीत, आपण एखाद्या गरजू-होतकरू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सांभाळ करावा. येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक कार्य पोटतिडकीने सांगूयात. येणाऱ्या 26 जूनला उच्च शिक्षणाची शपथ घेऊन हा सण साजरा करूयात.
टीम- लेखणी चळवळीची
◆YouTube/ लेखणी चळवळीची
◆Facebook/लेखणी चळवळीची ◆lekhnichalvalichi@gmail. com
◆Lekhnichalvalichi.blogspot.com