योजनेचा उद्देश –
अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड करण्याच्या उद्देशाने सदर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून विद्यार्थी कुठल्याच आर्थिक अडचणी शिवाय ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्यात शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
योजनेचे वैशिष्ट्य –
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.