उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DTE) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24

योजनेचा उद्देश

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.

योजनेचे वैशिष्ट्य

विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे रेशन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
मागील वर्षाची गुणपत्रिका
अधिवास प्रमाणपत्र
रहिवाशी दाखला
अल्पसंख्याक प्रमाणपत्र
चालू वर्ष शुल्क (फी) पावती.

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?