मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)

योजनेचा उद्देश

उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे.
उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.

योजनेचे वैशिष्ट्य
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची परतफेड प्रदान करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचा रहिवाशी दाखला
अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
जात पडताळणी प्रमाणपत्र
गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका
वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांनी प्रदान केलेला)
पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)
डोमेसाइल प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
CAP फेरी वाटप पत्र

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?