| घटक | माहिती |
|---|---|
| Singer | श्रावण यशवंत (Shravan Yashwante) |
| Music By | मधुर पाठक (Madhur Pathak) |
| Lyricists | वामन कर्डक, गौतम सूत्रावे, राम मोरे, जी. आर. पालकर, गणपत शिंदे, लक्ष्मण केदार, विष्णू डांगे |
| Album | बुद्धं शरणं गच्छामि – अमर बुद्धगीते (Buddham Sharanam Gachchhami – Amar Buddhgeete) |
करून करणी दिपवली धरणी
भयान रात होती जेव्हा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवाअन्यायाची सुरी धरी माणूस माणसावरी
असली दादागिरी पाहुनी भीम पेटला उरी
तयार झाला रणी उतरला, गर्जत सिंहाचा छावा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवानरकातून ह्या निघा जगा माणूस म्हणुनी जगा
कपटी जुलमी जगा त्यागुनी, पावन जीवन बघा
नाही हादरला सांगत फिरला धडाडीने गावोगावा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवात्या भगवंतापदी लीन तो झाला सर्वाआधी
जन हे लक्षावधी टाकिले नंतर ओटीमधी
हीन-दीनाना दुःखी जीवांना, दिला सुखाचा हा ठेवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवाह्या वस्तीला धनी हजारो वर्षे नव्हता कुणी
आला भीम-नरमणी टाकिली नगरी हि बदलुनी
लक्ष्मणा ही करणी पाही, जग सारं करतंय वाहवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा