आपल्या सामान्य जनतेला पोलिसांचा धाक वाटतो मग त्यांना वाटत की त्यांच्या चुकीच्या वागण्याला सामान्य माणूस विरोध करू शकत नाही.. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकत नाही तर हा गैरसमज डोक्यातून आधी काढून टाका..
कुठल्याही डिपार्टमेंट मधले पोलीस जर सामान्य लोकांवर मुद्दाम हात उचलत असतिल, त्यांना नाहक त्रास देत असतिल, गैरवर्तन करत असतिल कायद्याचे उल्लंघन करत असतिल तर त्यांच्यावर सामान्य जनता कायदेशीर कारवाई करू शकते..
तर तुम्ही पोलिसांनी गैरवर्तन केल्यावर त्यांच्यावर तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकता किंवा राज्य मानवाधिकार SHRC किंवा राष्ट्रीय मानवाधिकार NHRC कडे त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता..
तुम्ही कोर्टातून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश घेऊ शकता..
पण त्यासाठी तुमच्याकडे पुरावे असणे गरजेचे आहे.. उदा. फोटो, व्हीडिओ, मेडिकल रीपोर्ट आणि eye witness म्हणजेच साक्षीदार असेल तर तुम्हाला FIR करणे सोपे जाईल यासाठी तुम्ही क्रिमिनल ॲडव्होकेटचा सल्ला घेऊ शकता त्यांची मदत घेऊ शकता..
घाबरू नका न्याय व्यवस्था तुमच्यासाठीच आहे.. अन्यायाविरुद्ध लढा..
✒️
👩🏻⚖️ ॲड.स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.
८८२८६७७१०२