समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत आदिनाथ ची शिष्यवृत्ती केली मंजूर.

आदिनाथ घाडगे, हा विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत सध्या University of Aberdeen येथे Artificial Intelligence विषयात PhD करत आहे.
ऑक्टोबर महिन्यात अभ्यासक्रम मुदतवाढीकरिता त्याने समाज कल्याण कडे अर्ज केलेला आहे. मुदतवाढीच्या मंजुरीकरिता तो सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होता. परंतु त्यास शासनाचे मंजुरीपत्रक मिळाले नाही.परिणामी त्याला शिष्यवृत्तीची पुढील रक्कम मिळाली नव्ह्ती.
त्याचा परिणाम त्याचे अभ्यासक्रम व दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक बाबींवर पडला. शिष्यवृत्तीच्या अभावीआदिनाथचे मागील ३ महिन्याचे घर भाडे थकले होते.त्याचे घरमालकाने त्याला इशारा दिला होता की या आठवड्यात जर घर भाडे मिळाले नाही तर, घर सोडून जावे लागेल.
सदर विद्यार्थी सारखा सामाजिक न्याय विभागाचे विविध अधिकारी आणि मंत्री धनंजय मुंडे ह्यांना लवकरात लवकर शासनाचे मंजुरी पत्रक व शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी अशी आर्जव करीत होता.
वंचित युवा आघाडीने आक्रमक होत ह्या बाबत मंत्री मुंडे, त्यांचे पीए, समाज कल्याण आयुक्त डॉ नारनवरे, सचिव बॅनर्जी मॅडम, अवर सचिव अश्विनी यमगर ह्यांना संपर्क साधला.त्यांना धारेवर धरताच त्यांनी मंजुरी पत्र दिले होते.मात्र आदिनाथ ची शिष्यवृत्ती बाकी होती.
सामाजिक न्यायाचे नावावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बळी घेतले जाणार असतील तर वंचित बहुजन युवा आघाडी सहन करणार नाही.असा दम भरल्याने समाज कल्याण सचिव बॅनर्जी मॅडम ह्या तातडीने पुण्यात दाखल झाल्या. त्यांनी झाडाझडती घेतली.आयुक्त डॉ नारनवरे ह्यांनी स्वतः आदिनाथ ला संपर्क साधला.काल आयुक्तालयात ज्या विध्यार्थ्यांना अडचणी होत्या त्यांना बोलवून घेऊन अनेक विषय मार्गी लागले.
समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत शिष्यवृत्ती मंजूर केली.त्यामुळे आदिनाथ बेघर होण्यापासून थोडक्यात बचावला.
नवलाची बाब म्हणजे आयुक्त आणि सचिव दर्जाचे अधिकारी केलेल्या कॉल किंवा मेसेजला उत्तर देतात मात्र खालचे अधिकारी अद्यापही साहेबी रुबाबातून बाहेर यायला मागत नाही.खरी अडचण आहे ती मनोवृत्ती बदलण्याची, विद्यार्थी हितासाठी लवकरच एक भेट समाज कल्याण आयुक्तालयातील गेंड्याच्या कातडी असलेल्या अधिकारी ह्याचा लवकरच वर्ग घेणार आहोत.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?