बुद्धवाणी:पाली भाषा,धम्मलिपी

पाली भाषा ही प्राचीन लोकभाषा असून ती प्राचीन बौद्ध साहित्याची परिभाषा आहे.’पाली’चा आर्थ पालन अथवा रक्षण करणे असा होतो. भ.बुद्धांनी तत्कालीन सर्वसामान्य लोकांच्या मागधी भाषेत आपल्या धम्माचे त्वज्ञान समजाऊन सांगितले.बुद्धधम्माचे ‘त्रिपिटक’ हे ‘पाली’ भाषेत लिहिलेले आहे.त्रिपिटकात बुद्धाचे धम्मोपदेश संकलीत करून ते समजावून सांगितलेले आहेत.म्हणून ‘पाली’ ही ‘बुद्धवाणी’ आहे.
प्राचीन बौद्ध साहित्यकार बुद्धघोषाने ४ शतकात “पाली” शब्दांचा व्यापकार्थाने प्रयोग केल्याचे दिसून येते. त्याने श्रीलंकेत सिंहलीत अस्तित्वात असलेल्या त्रिपिटकावर पाली (मागधी) मधून आट्टकथा लिहिलेल्या सुप्रसिद्ध आहेत. तसेच पहिल्या शतकात अश्वघोष निर्मित साहित्यकृतीत पाली भाषेचा मोठा उपयोग केल्याचे निदर्शनास येते. तसेच ‘पाली’ भाषाही त्रिपिटकाची भाषा असून त्यात बुद्धांनी वेळोवेळी केलेल्या धर्मोपदेशाची सूत्ते समाविष्ट केलेली आहेत. पाली त्रिपिटक हा विश्वातील बौद्धांचा पवित्र व प्रमाण ग्रंथ आहे.’बौद्धांचा धर्म’ या शब्दाचा आर्थ स.अशोकाने आपल्या शिलालेखात ‘धम्म’ ह्या पाली भाषेतील शब्दाला लावल्याचे दीसते. त्याला “धम्मलिपी” असे संम्बोधतात. म्हणूनच पाली भाषा ही बुद्ध भाषा आहे. तसेच ‘पाली भाषा’ व ‘प्राकृत भाषा’ या मध्ये शक्यतोवर समानता दीसून येते.
भारतीय मध्ययुगात ज्या अनेक प्रादेशिक भाषा बोलल्या जात होत्या त्या पैकी ‘प्राकृत’ ही एक भाषा आहे. ‘वैदीक भाषेला’ सर्वात जवळची भाषा ही ‘प्राकृत भाषा’ म्हणजे ‘पाली भाषा’ ही आहे. तसेच प्राचीन भारतात ‘संस्कृत भाषा’ संपन्न होण्यास ‘पाली भाषे’चा महत्वपूर्ण सहभाग आहे.
२५०० वर्षांपूर्वीचे भारतीय समाज व्यवस्थेतील समाजकारण धर्मकारण,राजकारण तसेच प्रजाजनाचे सन उत्सव,आचार विचार,चाली रीती, रूढी परंपरा, विश्वास, श्रद्धा, लोकजीवन इ.चा उज्वल इतिहास हा आपणास अर्वाचीन काळात पाली भाषेमुळे समजून घेता येतो व वैघ्यानिक अभ्यास ही करता येतो.त्या साठी ‘पाली भाषा’ ही अवगत असणे गरजेचे आहे. बौद्ध सम्राट अशोकाच्या शिलालेखातील धम्मज्ञा व नाणी, ताम्रपट, आपणास समजून घ्यायचे असतील तर पाली भाषाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
बुद्धधम्म हा अखिल मानवजातीच्या व प्राण्यांच्या कल्याणकारी मार्गाचा ठेवा आहे.धम्मलिपी, पाली भाषेतील प्रबोधनकारी विचारधारा विकसित करायची असेल, प्रवाहित ठेवायची असेल व सतेज करायची असेल तर ‘पाली भाषा’ ही सर्व बौद्ध आंबेडकरी धारेच्या साहित्यिकांना, विचारवंतांना व सामाजिक कार्यकर्त्यांना अवगत असणे आवश्यक आहे.
तसेच येणाऱ्या पीढी साठी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थांना पाली भाषांचे अध्यापन करणे व त्यांनी अध्यायन करण्याचा संकल्प करणे जरूरीचे आहे. तसेच सामान्य जनाला पाली भाषा शिकण्यासाठी आग्रह धरणे गरजेचे आहे.’,”पाली भाषेचा विकास हाच बौद्ध धम्म वृद्धिंगत करण्याचा ध्यास” आहे. हे गृहीत धरणे प्रत्येक आंबेडकरी बौद्ध नागरिकाचे कर्तव्यच आहे.असे मला वाटते.
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
-सुनिल सोनवणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?